अमिताभ यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, "वडिलांच्या कवितेचे काही क्षण. ते अशाच पद्धतीने कवी संमेलनात कविता करायचे. रुग्णालयात एकटेपणात त्यांची मला खूप आठवण येते आणि शांत रात्रीत मी त्यांच्या शब्दांमध्ये मग्न होऊन जातो" या व्हिडीओत अमिताभ यांनी आपल्या वडिलांची एक कविता आपल्या आवाजात वाचलीदेखील आहे. कोरोनाचं निदान झाल्यानंतर 77 वर्षांचे अमिताभ बच्चन आणि 44 वर्षांचा अभिषेक बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ऐश्वर्या राय आणि आराध्या कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे वाचा - बच्चन कुटुंबाकडून खूशखबर! ऐश्वर्या राय आणि आराध्या कोरोनामुक्त अमिताभ रुग्णालयात उपचार घेत आहेत याला आज 17 दिवस झालेत. मुंबईतील नानावटी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या पंधरा दिवसात त्यांच्यावर कसे उपचार होत आहेत, कोरोनाशी लढा देताना त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं आहे, याबाबत अमिताभ व्यक्त झाले आहेत. आपल्या ब्लॉगमार्फत त्यांनी हा संपूर्ण अनुभव मांडला आहे. हे वाचा - माझ्याजवळ कुणीच येत नाही; कोरोनावर उपचार घेत असलेल्या बिग बींनी शेअर केला अनुभव उपचारादरम्यान आठवडाभर रुग्णाला दुसरा माणूसच दिसत नाही. मेडिसीन केअरसाठी नर्स आणि डॉक्टर्स येतात मात्र ते पीपीई सूटमध्ये असता. ते कोण आहेत हे तुम्हाला समजत नाही. ज्या डॉक्टराच्या निगरानीत कोविड रुग्णावर उपचार होतात. ते डॉक्टर कधीच रुग्णाच्या जवळ येत नाहीत असं सांगत या सर्व परिस्थितीचा रुग्णांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Coronavirus