Home /News /entertainment /

Fact Check: आदित्य ठाकरेंनी आदेश देताच 'फिल्म सिटी बंद', वाचा काय आहे सत्य

Fact Check: आदित्य ठाकरेंनी आदेश देताच 'फिल्म सिटी बंद', वाचा काय आहे सत्य

राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने फिल्म सिटी बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  शिखा धारीवाल,(प्रतिनिधी) मुंबई,17 मार्च:कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाने तीन जणांचा बळी घेतला आहे. याचा परिणाम मुंबईतील मायानगरीवर अर्थात फिल्म सिटीवर झाला आहे. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने फिल्म सिटी बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, 'News18 लोकमत'ने केलेल्या पडताळणीत वेगळेच सत्य समोर आलं आहे. हेही वाचा...कोल्हापुरातील गगनबावडा परिसरात मुसळधार पाऊस महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फिल्म इंडस्ट्रीचे टीव्ही आणि वेब चेअरमन जेडी मजिथिया यांच्याशी दुरध्वनीवर संवाद साधला. फिल्म इंडस्ट्रीतील एकूणात परिस्थितीचा आढावा घेतला. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांनी फिल्म ,टीव्ही आणि वेब इंडस्ट्रीतील शूटिंग तत्काळ बंद करण्याचे निर्देश चेअरमन जे.डी. मजिथिया यांनी दिले आहेत. तसेच शूटिंग बंद करण्यासाठी बीएमसीला नोटिस देण्याच्या सुचना देखील दिल्या असल्याची माहिती सोशल मीडियातून फिरत होती. या माहितीमुळे फिल्म सिटीत खळबळ उडाली. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने कर्मचारी आणि फिल्म स्टूडिओ अँड एलाइड मजदूर यूनियन संस्था आक्रमक झाली. हेही वाचा...कोरोनामुळे औरंगाबाद, नवी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठा निर्णय याबाबत 'News18 लोकमत'ने आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला. एवढंच नाही तर फिल्म सिटीत सुरु असलेल्या फिल्म आणि टेलिव्हिजनसोबतच रियलिटी शोच्या सेटवर जाऊन 'News18 लोकमत'च्या टीमने पडताळणी केली. सेट शूटिंग सुरु नव्हती. तसेच फिल्म सिटीत तत्काळ शूटिंग बंद करण्याबाबत बॅनर लावलेले दिसून आले. फिल्म सिटीत सर्वत्र 'सन्नाटा' पसरला आहे. याबाबत फिल्म सिटीचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर सुभाष शांताराम बोरकर यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता बीएमसीच्या आयुक्तांच्या निर्देशानुसार तत्काळ शूटिंग सेट बंद करण्यात आले आहे. कपिल शर्माचा रियलिटी शो आणि संजय लीला भंसाली यांचा फिल्म सेटसह सर्व सेटवरील शूटिंग रोखण्यात आले आहे. हेही वाचा...Coronavirus प्रसार रोखण्यासाठी मोठा निर्णय; पुढचे 7 दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार - सूत्र
  सीरियल सेटवरील शूटिंग बंद करण्यात आले असले तरी फिल्म इंडस्ट्रीत रोजंदारीवर काम करणारे ज्युनिअर आर्टिस्ट ,साउंड रेकोर्डिस्ट ,लाइटमन ,स्पॉट बॉय सारख्या लोकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. मात्र, त्यावर फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने इंडिया कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी सांगितलं की, रोजंदारी काम करणारे फ्रीलान्सच्या हिशेबानं काम करणारे ज्युनिअर आर्टिस्ट ,साउंड रेकोर्डिस्ट ,लाइटमन ,स्पॉट बॉय यांनी पगार मिळणार आहे. काही लोकांना वर्क फॉर्म होम करतील. त्यांच्या सॅलरीवर कोणताही परिणाम होणार नाही.
  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Aaditya thackeray, Corona virus in india

  पुढील बातम्या