Coolie No 1 Trailer: जुन्या सिनेमाला नवा तडका; वरुण साराची रोमँटिक केमिस्ट्री

Coolie No 1 Trailer: जुन्या सिनेमाला नवा तडका; वरुण साराची रोमँटिक केमिस्ट्री

कुली नंबर 1(Coolie No 1)चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तुम्हाला काय आवडेल? गोविंदचा डान्स, भन्नाट एक्स्प्रेशन्स? की वरुण धवनचा ड्रामा आणि हॉट लूक्स? ट्रेलर पाहून तुम्हीच ठरवा ना!

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर: अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) कुली नंबर 1 (Coolie No 1) हा चित्रपट 25 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण आधीच पूर्ण झालेले होते. परंतु कोरोना व्हायरस साथीमुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. पण आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. त्याचं पोस्टर रिलीज झालं होतं. त्याचा अधिकृत ट्रेलर रिलीज झाला आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी लाँच झालेला पोस्टरमध्ये वरुण धवन वेगवेगळ्या वेशभूषांत दिसत होता त्याच्यासोबत सारा अली खान (Sara Ali Khan) सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसून आली.

1995 मध्ये गोविंदा (Govinda) आणि करिश्मा कपूर यांचा कुली नंबर 1 हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्याची गाणीही खूप लोकप्रिय झाली होती. डेव्हिड धवन यांनी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांनीच आता त्यांचा मुलगा वरूण आणि सारासोबत आपल्याच चित्रपटाचा रिमेक केला आहे. या ऑनस्क्रिन जोडी मधली केमिस्ट्री आपल्याला या चित्रपटात लवकरच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर पाहून प्रेक्षक अधिकच उत्सुक आहेत. कारण या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये वरूण वेगवेगळ्या रोलमध्ये दिसलेला आहे.

कुली नंबर वन हा चित्रपट 2020 मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण कोरोना व्हायरस साथीमुळे चित्रपट प्रदर्शन डिसेंबरपर्यंत पुढं गेलं. तरीही कोरोना व्हायरस महामारीमुळे हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती कधी आटोक्यात येऊन सर्व कधी योग्यरित्या सुरू होईल याचा काहीच अंदाज नाही त्यामुळे दिग्दर्शकांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून लवकरात लवकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तसेच या चित्रपटात परेश रावल, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे विनोदी अभिनेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा कॅनव्हास मोठा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आहे. वरूण आणि साराचे डान्स, गाणी आणि रंजक कहाणी यांनी हा चित्रपट सजला आहे असं ट्रेलरवरून वाटत आहे. तुम्ही पाहिलात का ट्रेलर?  लवकर पाहा.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 28, 2020, 5:18 PM IST

ताज्या बातम्या