मुंबई, 25 डिसेंबर : 1995 साली प्रदर्शित झालेला आणि गोविंदा-करिश्मा यांची मुख्य भूमिका असलेला 'कुली नं. 1' हा (Coolie No1 Movie) एक प्रचंड गाजलेला चित्रपट होता. त्या चित्रपटातला प्रत्येक डायलॉग आणि विनोद अतिशय जुळून आलेले आणि विनोदी होता. हा चित्रपट म्हणजे डेव्हिड धवनच्या स्लाईस ऑफ लाइफ कॉमेडीचा उत्तम नमुना होता. एक साधं कथानक, योग्य डायलॉग डिलीव्हरी, उत्कृष्ट कॉमेडी टायमिंग आणि अतरंगी असली तरी लक्षात राहणारी आणि दीर्घ काळापर्यंत जीभेवर राहिलेली गाणी ही डेव्हिड धवन यांच्या चित्रपटांची ओळख. आता डेव्हिड धवनच्या मुलाचा नवा Cooli No1 कसा आहे? या चित्रपटाचं परिक्षण आमच्या
NEWS18.com या वेबसाइटवर प्रसिद्ध झालं आहे.
डेव्हिड धवन (David Dhawan) यांनी दिग्दर्शित केलेले, आंखें, शोला और शबनम, कुली नंबर 1, जुडवा, हीरो नंबर 1 हे सर्व चित्रपट मध्यमवर्गीय गरीब मुलगा आणि श्रीमंत मुलींच्या कथांसारखेच होते. पण या चित्रपटांनी आपल्याला खळखळून हसवलं. यामुळं आपल्याला या कथेतील साधेपणा आणि कॉमेडीचा एक वेगळा नमुना आपल्याला पाहायला मिळाला.
पण दुर्दैवाने डेव्हिड धवन यांचा, नुकताच प्रदर्शित झालेल्या 'कुली नंबर 1' च्या रीमेकमध्ये आपल्याला डेव्हिड धवनचा पूर्वीचा झलक पाहायला मिळत नाही. या चित्रपटात मुख्य भूमिका त्यांचा मुलगा वरुण धवन आणि सारा अली खान यांनी साकारली आहे. हा चित्रपट अर्ध्या भाजलेल्या केक सारखा आहे. ज्याला हा पदार्थ मी बनवलाय हे सांगायलाही भिती वाटावी. यातील काही डायलॉग सोडले, तर बाकीचा सर्व चित्रपट भरकटलेला आहे. त्यामुळे दर्शकांसाठी फारच रटाळवाना ठरतो. यावर आता दर्शकांच्या प्रतिक्रियाही यायला सुरू झाल्या आहेत. दर्शकांच्या प्रतिक्रियांमध्ये या चित्रपटाची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे.
या चित्रपटाच्या कथेत काहीच नवीन नाही. गोव्यातील हॉटेलचा मालक रोझारियो (परेश रावल) हा जयकिशन (जावेद जाफेरी) या मॅचमेकरचा अपमान करतो. त्यामुळं तो श्रीमंत रोझारियोची मुलगी सारा (सारा अली खान) हीचं लग्न स्टेशनवर कुलीचं काम करणाऱ्या राजू (वरूण धवन) सोबत लावून देतो. त्यामध्ये गाण्याचे रीमेक, सीन रिमेक आणि डान्स रिमेक आहेत. या चित्रपटातील बऱ्यापैकी सीन, हावभाव हुबेहुब कॉपी केलेले आहे. स्वतः च्याच चित्रपटाचा रिमेक केला तर कॉपी करायला काही मर्यादा राहत नाहीत.
या चित्रपटातील संवाद पूर्णपणे निराश आहेत. या चित्रपटाकडून जेवढी अपेक्षा होती तिथपर्यंत या चित्रपटाला पोहचता आलं नाही. यामध्ये गोविंदाच्या उत्स्फूर्ततेची आणि जादूची कमी जाणवली. 134 मिनिटांचा कालावधी असलेल्या या चित्रपटात गाणी संपता संपत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.