साराच्या हातून गेला Coolie No. 1, मिळाला 'या' अभिनेत्रीला

साराच्या हातून गेला Coolie No. 1, मिळाला 'या' अभिनेत्रीला

कुली नं. 1च्या रिमेकमध्ये वरुण धवनसोबत सारा अली खान असणार होती. पण आता या अभिनेत्रीचा वर्णी लागलीय.

  • Share this:

मुंबई, 05 जानेवारी : गोविंदाचा सुपरहिट सिनेमा 'कुली नं.1'चा रिमेक होतोय, हे तर माहीतच आहे. त्याचं दिग्दर्शन डेव्हिड धवन करतोय. वरुण धवनची त्यात मुख्य भूमिका आहे. तर वरुणसोबत सारा अली खान असणार होती. पण आता चित्र वेगळंच दिसतंय.

सारा तो सिनेमा करणार नाही. तिच्या जागी आता आलीय आलिया भट्ट. म्हणजे आलिया आणि वरुण यांची जोडी सिनेमात दिसेल. सुरुवातीला वरुण धवन हा सिनेमा करणार नव्हता. पण आता तो तयार झालाय.

कुली नं.1 हा गोविंदाचा सिनेमा सुपहिट होता. आता त्याचा रिमेकही आजच्या काळाला साजेसा बनवला जाणार आहे. या सिनेमाची निर्मिती वरुणचा भाऊ रोहित धवन करणार आहे. याच वर्षी सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे.

साराचे गेल्या वर्षी दोन सिनेमे रिलीज झाले. केदारनाथ आणि सिंबा. त्यामुळे आता पुन्हा तिला बरेच सिनेमे मिळतायत, अशी चर्चा होती.

काॅफी विथ करण शोमध्ये सारानं सांगितलं की तिचं आजारामुळे वजन वाढलं होतं. तिच्या आजाराचं नाव आहे पीसीओएस. यात ओव्हरीजमध्ये गाठी येतात. यात वजनही खूप वाढतं. आणि मग ते कमी करणं हे खूप मोठं आव्हान असतं.

साराचंही वजन 96 किलो झालं होतं. तिनं ते प्रयत्नपूर्वक कमी केलं. करण जोहरचा प्रसिद्ध शो कॉफी विथ करण सिझन-6 मध्ये सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा अली खान आले आहेत. या शोमध्ये दोघांनीही फार धमाल केल्याचं दिसलं.

करिनानं साराच्या अभिनयाचं कौतुकही केलं.शिवाय तिच्यासाठी पार्टीही ठेवली.

ईशा-विक्रांतच्या एका लग्नपत्रिकेची किंमत कळली तर तुम्हाला धक्काच बसेल

First published: January 5, 2019, 7:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading