प्रियांका चोप्राचा पासपोर्ट रद्द करा आणि तिला पाकिस्तानात पाठवा, करणी सेनेची धमकी

ट्विटरवरून माफी मागितल्याने भारतीयांना समाधान मिळणार नाही. त्यामुळे प्रियांकाने सगळ्यांसमोर माफी मागावी नाहीतर तिला हे प्रकरण महागात पडेल असा इशाराही करणी सेनेकडून देण्यात आला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2018 02:17 PM IST

प्रियांका चोप्राचा पासपोर्ट रद्द करा आणि तिला पाकिस्तानात पाठवा, करणी सेनेची धमकी

मुंबई, 10 जून : प्रियांका चोप्राचा पासपोर्ट रद्द करा आणि तिला पाकिस्तानात पाठवा अशी धमकी करणी सेनाने दिली आहे. प्रियांका चोप्राने तिची क्वांटिको ही मालिका सोडून द्यावी, नाहीतर तिला करणी सेनेच्या विरोधाला सामोरं जावं लागेल असंही करणी सेनाने म्हटलं आहे. या सगळ्यामुळे प्रियांका चोप्राच्या क्वांटिको मालिकेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, क्वांटिको या मालिकेत भारताला दहशतवादी दाखवल्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद पेटला होता. त्यावर प्रियांकाने ट्विटरवरून माफीही मागितली होती. पण करणी सेनाला प्रियांकाचा माफीनामा आवडला नसल्याचं दिसतंय. पद्मावत सिनेमानंतर आता त्यांनी प्रियांकावर निशाणा साधला आहे.

ट्विटरवरून माफी मागितल्याने भारतीयांना समाधान मिळणार नाही. त्यामुळे प्रियांकाने सगळ्यांसमोर माफी मागावी नाहीतर तिला हे प्रकरण महागात पडेल असा इशाराही करणी सेनेकडून देण्यात आला आहे. दरम्यान, तिचा पासपोर्ट रद्द करावा अशी मागणीही करणी सेनेनं केंद्र सरकारकडे केली आहे.

भारताला दहशतवादी म्हणणाऱ्या प्रियांकाला भारतात राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे तिने पाकिस्तानात जाऊन राहावं अशी धमकीही करणी सेनेनं दिली आहे. आता या सगळ्यावर प्रियांका चोप्रा काय प्रतिक्रिया देते याकडेच चाहत्यांचं लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2018 02:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...