S M L

विरूष्काच्या लग्नातला वाद अखेर चव्हाट्यावर!

नुष्काचा वेडिंग ड्रेस डिझाईन करणाऱ्या सब्यासाची मुखर्जीने मात्र हे फोटोज त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करताना त्याला क्रेडिटच देऊ केलं नाही.

Sachin Salve | Updated On: Dec 15, 2017 03:37 PM IST

विरूष्काच्या लग्नातला वाद अखेर चव्हाट्यावर!

14 डिसेंबर : लग्नघरात आलेल्या पाहुण्यांचे रूसवे फुगवे सगळ्यांनाच सहन करावे लागतात. तुमच्या आमच्या घराप्रमाणे विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं लग्नही त्याला अपवाद ठरलेलं नाही. फरक एवढाच की हे मानापमान नाट्य त्यांच्या नातेवाईकांमध्ये नाही तर त्यांच्या फॅशन डिझायनर आणि वेडिंग फोटोग्राफरमध्ये घडलंय.

झालं असं की विराट आणि अनुष्काचे काढलेली सुंदर पोट्रेट्स वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे फोटोज ख्यातनाम वेडिंग फोटोग्राफर जोसेफ राधिकने काढलेले होते.

आपल्या लग्नातील प्रत्येक फोटोत कोणताही फिल्मीपणा नसावा तर ते एखाद्या पोट्रेटप्रमाणे दिसावे असे त्याला अनुष्काने स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार या पठ्ठयाने जीवाचं रान करून उत्तम फोटोज काढले. मात्र अनुष्काचा वेडिंग ड्रेस डिझाईन करणाऱ्या सब्यासाची मुखर्जीने मात्र हे फोटोज त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करताना त्याला क्रेडिटच देऊ केलं नाही.


झालं! जोसेफ महाराजांचा पारा चढला आणि त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतची आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

माझे फोटोज वापरलेत तर निदान त्याचं क्रेडिट तरी मला द्या अशी माफक अपेक्षा त्याने या पोस्टमध्ये व्यक्त केली. त्यामुळेच विरूष्काचं लग्नादरम्यान घडलेल्या या प्रसंगामुळे हे मानापमान नाट्य समाजमाध्यमातून लोकांसमोर आलं आणि विराट -अनुष्काचं लग्नही वादाला अपवाद ठरू शकलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 03:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close