मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी...'; अमेय आणि सुमीतमध्ये वादाची ठिणगी, काय आहे नेमकं प्रकरण?

'फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी...'; अमेय आणि सुमीतमध्ये वादाची ठिणगी, काय आहे नेमकं प्रकरण?

amey wagh and sumeet raghvan

amey wagh and sumeet raghvan

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ सतत सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. अमेय जितका त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तितकाच तो त्याच्या विनोदी शैलीसाठीही ओळखला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 25 सप्टेंबर : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ सतत सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. अमेय जितका त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तितकाच तो त्याच्या विनोदी शैलीसाठीही ओळखला जातो. सोशल मीडियावर तो नेहमीच मजेशीर कॅप्शनसह पोस्ट शेअर करत असतो. अशातच अमेय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी अमेयच्या पोस्टने सगळ्यांनाच गोंधळात टाकलं आहे.

अमेय वाघने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतेय. 'जंगलात राघू सुमीत राघवन खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो... याची कृपया नोंद घ्यावी'. अमेयच्या या पोस्टने सगळ्यांनाच गोंधळात टाकलं आहे. यावर सुमीत राघवननेही एक पोस्ट लिहीत त्याला उत्तर दिल्याचं पहायला मिळाली.

'सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय.. कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ हॉट नाही याचीही कृपया नोंद घ्यावी', सुमीतने अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे आता दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. मात्र हा वाद नक्की कशामुळे झालाय?, नक्की काय प्रकरण आहे, असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. त्यामुळे दोघांच्याही पोस्टनं सगळीकडे गोंधळ उडवला आहे.

अमेयने केलेली ही पोस्ट वादातून केली आहे की यामगे काही प्रमोशन फंडा आहे?, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याविषयी दोघं पुढे काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Actor, Facebook, Marathi entertainment, Marathi news