‘येऊ कशी तशी..’च्या ‘त्या’ दृश्यावर प्रेक्षकांना संताप अनावर

‘येऊ कशी तशी..’च्या ‘त्या’ दृश्यावर प्रेक्षकांना संताप अनावर

झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘ येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या एका वादग्रस्त दृश्यामुळे प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जात आहे.

  • Share this:

मुंबई, 5 मार्च: मालिकांशी प्रेक्षकांचं अगदी जिव्हाळ्याच नात तयार झालेलं असत. त्यातील पात्र, दृश्य त्यांना काही कालांतराने आपल्याच घरातील आणि सभोवतालचा एक भाग वाटू लागतात. आणि अशात तिथे जर काही चुकीचं घडलं तर मात्र प्रेक्षकांना ते फारसं रुचत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ च्या बाबतीत पहायला मिळत आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठी वरची मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. यातील ‘स्वीटू’, ‘ओमकार’, ‘मालविका’, ‘रॉकी’, ‘नलू’, ‘मिसेस खानविलकर’ ही मुख्य पात्र रसिक प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घालत आहेत. गरीब घरातील ‘स्वीटू’, आणि श्रीमंत घरचा ‘ओमकार’ यांच्या प्रेमकथेवर आधारित या मालिकेच कथानक आहे.

परंतू परवाच्या (2 मार्च) एपिसोड मध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या दृश्यात स्वतःच्या श्रीमंतीचा माज असणारी खानविलकरांची मोठी लेक मालविका आपला राग काढण्यासाठी रॉकीच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला अतिशय हीन वागणूक देताना दाखवलं आहे.

हे वाचा - उर्वशीच्या नव्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ; चाहत्यांनी केली मधुबालाशी तुलना

‘चित्रीकरणाच्या वेळी पशु पक्षांना इजा झालेली चालत नाही पण मग माणसाचा पशु झालेला चालतो का?’  असा प्रश्न प्रेक्षकांकडून विचारला जात आहे तर दुसरीकडे ‘महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोध करत असताना, एखाद्या पुरुषाच्या बाबतीत असं वागणं किंवा असं दृश्य चित्रित करून ते टीव्हीवर दाखवणं कितपत योग्य आहे?’ हा प्रश्न सुद्धा आता प्रेक्षक विचारत असून त्यावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

Published by: Aditya Thube
First published: March 5, 2021, 12:39 AM IST

ताज्या बातम्या