इस्तंबूल, 07 मार्च : प्लेबॉय मासिकाची प्रसिद्ध सुपरमॉडेल मारिसा पापेन (Marisa Papen) मोठ्या संकटात सापडली आहे. तिला 3 वर्षांचा तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. तिला ही शिक्षा लवकरत सुनावली जाऊ शकते. 2018 मध्ये, मारिसाने तुर्कीमधील अनेक प्रसिद्ध ठिकाणी एक न्यूड फोटोशूट केलं होतं. त्यानंतर तिच्यावर खूप टीका झाली होती.
इस्तंबूलच्या प्रसिद्ध हागया सोफाया मशिदीच्या दारातही मारिसाने न्यूड फोटो काढला होता. या फोटोनंतर सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली होती, त्यानंतर तुर्की प्रशासनाने मारिसाला नोटीस धाडून स्पष्टीकरण मागितलं होतं. तिने केवळ मशिदीतच नव्हे तर कॅपाडोसिया व्हॅली आणि इतरही अनेक ठिकाणी न्यूड फोटोशूट केलं होतं.
(हे वाचा- मलायकानं शेअर केला HOT PHOTO, डिझायनर म्हणाला ‘पुढे बघ नाही तर...)
द सनमध्ये छापण्यात आलेल्या या फोटोमध्ये मारीसाने मशिदीच्या दारामध्ये उभं राहून हा फोटो काढला आहे. तिने केवळ बुरखा घालून हा फोटो काढला आहे. सरकारी वकिलांनी म्हटले आहे की, ‘या प्रकरणात मारिसाविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. यामुळे देशाच्या प्रतिमेचे नुकसान होत आहे.’ त्यानी दिलेल्या माहितीनुसार, ‘मारिसाला या गुन्ह्यासाठी किमान तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते’.
(हे वाचा- खतरनाक VIDEO! अमृता खानविलकरच्या अंगावर पडलं वितळतं मेण आणि...)
मारिसा तिच्या न्यूड फोटोशूटविषयी आधीही वादात राहिली आहे. ती स्वत: चं स्वतंत्र विचारवंत आणि अभिव्यक्तिवादी म्हणून वर्णन करते. ऑस्ट्रेलियन छायाचित्रकार जेस वॉकरने तिचं फोटोशूट केले आहे. यापूर्वी या दोघांनीही इजिप्तमधील अनेक प्रसिद्ध ठिकाणी भेट देऊन असेच न्यूड फोटोशूट केले होते. मारिसाने या शूटबद्दल सांगते की, ‘आम्ही एका टूर ग्रुपसह मशिदीत गेलो होतो आणि जेव्हा इतर लोक गाईडबरोबर व्यस्त होते तेव्हा आम्ही संधी साधून तो फोटो काढला.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.