मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KBC 13 : स्वप्नांना मिळालं आर्थिक पाठबळ; जिंकलेल्या रकमेतून अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण करणार किन्नरी जोशी

KBC 13 : स्वप्नांना मिळालं आर्थिक पाठबळ; जिंकलेल्या रकमेतून अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण करणार किन्नरी जोशी

कोणाला शिक्षणासाठी, कोणाला आई-वडिलांसाठी तर कोणाला समाजासाठी काम करण्याकरता ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोमध्ये सहभागी होऊन पैसे मिळवायचे असतात.

कोणाला शिक्षणासाठी, कोणाला आई-वडिलांसाठी तर कोणाला समाजासाठी काम करण्याकरता ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोमध्ये सहभागी होऊन पैसे मिळवायचे असतात.

कोणाला शिक्षणासाठी, कोणाला आई-वडिलांसाठी तर कोणाला समाजासाठी काम करण्याकरता ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोमध्ये सहभागी होऊन पैसे मिळवायचे असतात.

मुंबई 09 सप्टेंबर : ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) अर्थात केबीसीचं (KBC) 13 वं पर्व सुरू झालं आणि अनेकांच्या स्वप्नांना (Dreams) धुमारे फुटले आहेत. या शोमधून अनेकांना काही प्रश्नांची उत्तरे देऊन एक कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळते. एक कोटी जिंकणाऱ्या भाग्यवान विजेत्याला सात कोटी जिंकण्याचीही सुवर्णसंधी असते. त्यामुळे देशभरातील लाखो लोक या शोमध्ये सहभागी होण्यासाठी धडपडत असतात. कोणाला शिक्षणासाठी, कोणाला आई-वडिलांसाठी तर कोणाला समाजासाठी काम करण्याकरता या शोमध्ये सहभागी होऊन पैसे मिळवायचे असतात. वर्षानुवर्षे एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तींची स्वप्नं यामुळं पूर्ण होतात तेव्हा स्पर्धकासह प्रेक्षकही हर्षोल्हासित होतात. बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांना भेटणं हे देखील अनेकांचं स्वप्न असतं. या शोमुळे नुकत्याच या खेळात सहभागी झालेल्या स्पर्धक किन्नरी जोशी यांच्या स्वप्नालाही पंख फुटले आहेत.

आजतक डॉट इननं दिलेल्या वृत्तानुसार, केबीसी-13च्या (KBC-13) बुधवारी (8 सप्टेंबर 21) झालेल्या भागात अहमदाबाद (Ahmadabad) इथं एका म्युझियमच्या (Museum) सहायक क्युरेटर (Assistant Curator) म्हणून काम करणाऱ्या किन्नरी जोशी (Kinnari Joshi) हॉटसीटवर होत्या. कोलकात्यात (Kolkata) जन्मलेल्या किन्नरी जोशी यांना खाण्याची आणि खिलवण्याची आवड आहे. जगातील सगळी म्युझियम्स बघण्याचं स्वप्न असलेल्या किन्नरी जोशी यांचं आणखी एक स्वप्न आहे ते म्हणजे अहमदाबाद इथं एक रेस्टॉरंट (Restaurant) उघडून तिथं बंगाली पदार्थही (Bengali Food) खाऊ घालण्याचं. त्यांनी जिंकलेल्या रकमेतून त्यांचं हे स्वप्न त्या पूर्ण करणार आहेत. 3 लाख 20 हजार रुपयांपर्यंतचा टप्पा यशस्वीपणे पार करणाऱ्या किन्नरी जोशी यांना सहा लाख 40 हजार रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देता आलं नाही. त्यामुळे त्यांना तीन लाख 20 हजार रुपयांच्या बक्षिसावरच समाधान मानावं लागलं.

ऑनलाइन क्लासमध्ये आराध्या करते अशा गोष्टी; अमिताभ यांनी स्वतः केला खुलासा

त्यांना 6 लाख 40 हजार रुपयांसाठी असा प्रश्न विचारण्यात आला होता की, यरवदा आणि बागेश्वरी यापैकी कशाचे दोन प्रकार आहेत ? किन्नरी जोशी यांनी ऊन हा पर्याय निवडला. मात्र ते उत्तर चुकीचं होते. बरोबर उत्तर चरखा (Charkha) हे होतं.

उत्तर चुकल्यामुळे किन्नरी जोशी यांना 3 लाख 20 हजार रुपयांची रक्कम बक्षिसादाखल मिळाली. या रकमेतून आपण एक रेस्टॉरंट उघडून तिथं बंगाली पदार्थही लोकांना खाऊ घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचं हे एक स्वप्न पूर्ण होण्यासाठी केबीसीची मदत झाल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी आनंद व्यक्त केला आणि किन्नरी जोशी यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

KBC 13:कोणत्या नेत्यानं शिक्षिका म्हणून सुरू केली कारकीर्द? 6 लाखासाठीचा प्रश्न

केबीसीमध्ये सर्वसमान्य स्पर्धकांसह सेलेब्रिटीजही सहभागी होत असतात. या शोमधून जिंकलेली रक्कम ते सामाजिक कार्यासाठी देतात. त्यामुळे प्रेक्षकही सेलेब्रिटीज स्पेशल भाग बघण्यासाठी उत्सुक असतात. केबीसी-13च्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या भागाचीही प्रेक्षक आतुरतेनं वाट पहात आहेत. कारण या भागात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan) सहभागी होणार आहेत. या भागात दीपिका पदुकोण आपला पती रणवीरसिंह (Ranveer Singh) याची तक्रार अमिताभ बच्चन यांच्याकडे करत असल्याचे प्रोमोमध्ये दिसते. त्यामुळे या भागाबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, KBC