बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींचं ISI आणि पाक आर्मीशी कनेक्शन; BJP नेत्याच्या आरोपानंतर उडाली खळबळ

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींचं ISI आणि पाक आर्मीशी कनेक्शन; BJP नेत्याच्या आरोपानंतर उडाली खळबळ

सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर आधीच बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याच्या या आरोपानंतर तर सिनेसृष्टीत मोठा भडका उडाला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जुलै : सध्या देश कोरोनासह चीनविरोधात सुरू असलेल्या वादालाही तोंड देत आहे. दुसरीकडे सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर तर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याने केलेल्या आरोपानंतर तर  बॉलिवूडमध्ये मोठा भडका उडाला आहे. भाजप उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांनी सोशल मीडियावर धक्कादायक आरोप केला आहे.

त्यांनी ट्विटर या आरोपामागे मोठा पुरावा असल्याचेही सांगितले आहे. त्यांच्यांकडे अनेक कागदपत्रे आहेत, त्यावरुन बॉलिवूड सेलिब्रेटींचं पाकिस्तान आणि आयएसआयशी कनेक्शन असल्याचं दिसून येतं. पांडा यांनी कोणाची नावं उघड केली नाही. मात्र त्यांनी विनंती केली आहे की देशभक्ती बाळगणाऱ्या बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी अशांना घरचा रस्ता दाखवावा. यापुढे त्यांनी असंही म्हटलं आहे की –बॉलिवूडमधील काहींच्या वैयक्तिक व व्यावसायिक कागदपत्रांवरुन त्यांचे पाकिस्तान आणि NRI शी संबंध असून यातून जम्मू-काश्मिरमध्ये हिंसेत भर पाडली जात आहे.

हे वाचा-चीनविरोधात भारतीय वायुसेना आक्रमक; 5 राफेल लढाऊ विमानं करणार तैनात

यानंतर पांडा यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातील एका प्रतिक्रियेत वापरकर्त्याने या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे, जेणेकरुन बॉलिवूडमधील घाण बाहेर काढता येईल. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने सांगितले की – अशांना बॉयकॉट करण्यापेक्षा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केली जात नाही. सध्या बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवरुन मोठी चर्चा सुरू आहे. अभिनेत्री कंगना रणौत सुशांत सिंहच्या मृत्यूमागे नेपोटिझम हे मोठं कारण असल्याचं सांगत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 22, 2020, 5:11 PM IST

ताज्या बातम्या