'इंदू सरकार' अखेर प्रदर्शित; काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खेळ बंद पाडले

'इंदू सरकार' अखेर प्रदर्शित; काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी  खेळ बंद पाडले

ठाण्यातील कोरम मॉलमधील आयनॉक्स चित्रपटगृहात काँग्रेसने हिंदी चित्रपट 'इंदू सरकार' बंद पाडलाय.

  • Share this:

28 जुलै :अत्यंत वादग्रस्त ठरलेला मधुर भांडारकरचा इंदू सरकार हा चित्रपट आज अखेर प्रदर्शित झाला. पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदू सरकारला ठाणे आणि जळगावमध्ये विरोध करण्यास सुरूवात केली आहे.

ठाण्यातील कोरम मॉलमधील आयनॉक्स चित्रपट गृहात काँग्रेसने हिंदी चित्रपट 'इंदू सरकार' बंद पाडलाय. ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी  मधुर भांडारकरांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. हा चित्रपट कुठेही प्रदर्शित करू नका अशी मागणीही थिएटर मालकांना काँग्रेस नेत्यांनी केली.

तर दुसरीकडे जळगाव जिल्हा काँग्रेसनेही सिनेमाला विरोध केलाय. नटवर मल्टिप्लेक्स बाहेरील पोस्टर्स काँग्रेस कार्यकर्त्यांनी फाडून टाकली. तसंच या चित्रपटगृहासमोर जोरदार निदर्शनंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. सिनेमाचा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्नही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 11:00 AM IST

ताज्या बातम्या