मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

UP Election: काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या बिकनी गर्लचे फोटो व्हायरल, अभिनेत्री म्हणाली...

UP Election: काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या बिकनी गर्लचे फोटो व्हायरल, अभिनेत्री म्हणाली...

Archana Gautam

Archana Gautam

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) 'बिकिनी गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हिला उमेदवारी दिली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 15 जानेवारी: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) 'बिकिनी गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हिला उमेदवारी दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणूक 2022 मुळे (UP Assembly Election 2022) वातावरण तापले आहे. दरम्यान, हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अर्चना गौतम यांचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होणाऱ्या या फोटोवर उमेदवार अर्चना गौतमने प्रत्युत्तर देताना नेटकऱ्यांना विनंती केली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर (Congress Announces First List of Candidate UP Assembly Election) करण्यात आली आहे. या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. यामध्ये 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम (Archana Gautam)हिचं देखील नाव आहे.

UP Election 2022: 'बिकिनी गर्ल'ला काँग्रेसचं तिकीट; अर्चना गौतम आहे तरी कोण? PHOTO

दरम्यान, तिचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावर अभिनेत्रीने ट्विट करत भाष्य केले आहे. 'मी मिस बिकिनी 2018 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. मी मिस उत्तर प्रदेश 2014 आणि मिस कॉस्मो वर्ल्ड 2018 राहिली आहे. मी लोकांना आवाहन करतो की, माझे प्रोफेशन आणि राजकीय करिअरला एकत्र करू नका.' अशा आशयाचे ट्विट अर्चना गौतमने केले आहे.

सध्या तिचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

26 वर्षीय माजी मिस बिकनी इंडिया अर्चना गौतमने राजकीय मैदानात प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अर्चनाची जादू राजकीय पटलावर चालते का? हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे. ऐतिहासिक हस्तिनापूर येथील निवडणुक जिंकल्यास सर्वांत प्रथम हस्तिनापूरचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करू, असे आश्वासन अर्चनाने उमेदवारी मिळताच दिले आहे.

First published:

Tags: Assembly Election, UP Election, Uttar pradesh news, काँग्रेस