अमिताभ बच्चन यांच्या विरोधात कोर्टामध्ये तक्रार दाखल, KBC मधील 'त्या' प्रश्नामुळे महानायक अडचणीत

अमिताभ बच्चन यांच्या विरोधात कोर्टामध्ये तक्रार दाखल, KBC मधील 'त्या' प्रश्नामुळे महानायक अडचणीत

यावर्षी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) टीआरीपीच्या रेसमध्ये काहीसा मागे पडत आहे. त्याचप्रमाणे आता बच्चन यांच्यासह या कार्यक्रमाशी संबंधित 7 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

मुजफ्फरपूर, 27 नोव्हेंबर: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नवीन सिनेमाची जशी वाट पाहिली जाते, त्याचप्रमाणे दरवर्षी त्यांच्या  'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या क्विझ शोच्या नव्या हंगामाची वाट पाहिली जाते. त्यांच्या सूत्रसंचालनाचे चाहते सर्वच वयोगटातील आहेत. दरम्यान यावर्षीच्या सीझनमध्ये केबीसीला (KBC) टीआरपीबाबत (TRP) काही संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे काही कायदेशीर बाबींना देखील सामोरे जावे लागत आहे. आता या कार्यक्रमाशी संबंधित 7 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि या 7 जणांमध्ये अमिताभ बच्चन यांचे देखील नाव आहे. मुजफ्फरपूर कोर्टात अमिताभ बच्चन यांच्यासह सात जणांविरोधात धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(हे वाचा-आमिर खानला हायकोर्टाचा दिलासा,अभिनेत्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली)

मिळालेल्या माहितीनुसार सिकंदरपूरमधील रहिवासी असणारे आचार्य चंद्रकिशोर पराशर यांनी गुरुवारी सीजेएम कोर्टात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, क्विझ शोचे दिग्दर्शक अरुणेश कुमार, राहुल वर्मा, टिव्ही चॅनेलचे अध्यक्ष मनजीत सिंग, सीईओ एनपी सिंग आणि सहभागी स्पर्धक  बेजवाड़ा विल्सन या सात जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मीडिया अहवालांनुसार पुढील सुनावणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे शो मध्ये धर्मशास्त्रासंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला होता, हा प्रश्न आणि त्याकरता देण्यात आलेले उत्तरासाठीचे पर्याय आक्षेपार्ह होते. यामुळे धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

(हे वाचा-अंकिताचा बॉयफ्रेंडबरोबर रोमँटिक डान्स, VIDEO पाहून सुशांतच्या चाहत्यांची टीका)

चंद्रकिशोर यांनी असा आरोप केला आहे की, 30 ऑक्टोबर रोजी ते केबीसीच्या सीझन 12 मधील एपिसोड पाहत होते, ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांचं सूत्रसंचालन करत होते. यामध्ये बैजवारा विल्सन स्पर्धक होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी 64 लाख रुपयांसाठी जो प्रश्न विचारला तो आक्षेपार्ह होता, ज्यामुळे हिंदू भावनांना ठेच पोहोचली आहे.

या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी 64 लाखांसाठी असा प्रश्न विचारला होता की, 25 सप्टेंबर 1927 रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथातील पानं जाळली होती? या प्रश्नाच्या उत्तरासाठी  A. विष्णुपुराण, B. भागवत गीता, C. ऋगवेद  D. मनुस्मृति असे चार पर्याय देण्यात आले होते. हा प्रश्न जाणुनबुजून विचारून हिंदू भावनांना ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप चंद्रकिशोर यांनी केला आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 27, 2020, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading