अर्जुन रामपाल वादात, पबमध्ये कॅमेरा फेकून मारल्याचा आरोप

अर्जुन रामपाल वादात, पबमध्ये कॅमेरा फेकून मारल्याचा आरोप

अभिनेता अर्जुन रामपालनं एका पबमध्ये एकाला कॅमेरा फेकून मारल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

  • Share this:

09 एप्रिल : अभिनेता अर्जुन रामपाल वादात सापडलाय.काल रात्री त्यानं एका पबमध्ये एकाला कॅमेरा फेकून मारल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

शोभीत हेमरजानी असं तक्रारदाराचं नाव आहे. दिल्लीच्या शँग्रिला हॉटेलच्या एका पबमध्ये रामपाल डीजेच्या भूमिकेत शिरला होता. तेवढ्यात त्याचा कुणीतरी फोटो काढला. रामपालनं कॅमेरा हिसकावून घेतला आणि ज्याचा कॅमेरा होता, त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण तो लागला तिसऱ्यालाच.

शोभीत हेमरजानी आणि त्याच्या मित्रांनी पोलिसांत तक्रार केली. पण पोलीस कारवाई करायला टाळाटाळ करतायेत. एफआयआरची प्रतही अजून तक्रारदाराला मिळाली नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2017 01:41 PM IST

ताज्या बातम्या