सैफची बायको आणि मुलगी यात सुरू आहे सुप्त स्पर्धा

सैफची बायको आणि मुलगी यात सुरू आहे सुप्त स्पर्धा

सारा अली खानचा केदारनाथ सिनेमा रिलीज झाला. तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं. त्याच वेळी तिची छोटी माँ करिनाही चर्चेत आली.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : सारा अली खानचा केदारनाथ सिनेमा रिलीज झाला. तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं. त्याच वेळी तिची छोटी माँ करिनाही चर्चेत आली.

करिनानं साराचा सिनेमा पाहिला आणि तिला तिचं काम आवडलं. तिनं तिची स्तुतीही केली. पुन्हा सारासाठी तिनं एक पार्टीही ठेवली. आता मात्र बऱ्याच गोष्टी बदलायला लागल्यात. साराचा दुसरा सिनेमा सिंबा अजून रिलीज झालेला नाही, तर तिला तिसरा मोठा सिनेमा मिळालाय, तो म्हणजे बाजी 3. त्यात ती टायगर श्राॅफबरोबर दिसणार आहे.

खरं तर सारा अली खान भल्याभल्यांना स्पर्धा देणार असं दिसतंय. त्यात तिची छोटा माँ करिना कपूरही आहे. आता करिनाच्या हातात किती सिनेमे आहेत ते पाहू.

पुढच्या वर्षी जानेवारीत करिनाचा गुड न्यूज रिलीज होईल. त्यात ती अक्षय कुमारसोबत आहे. करण जोहरच्या तख्तमध्येही करिना आहे. तो सिनेमा रिलीज व्हायला 2020 उजाडेल. त्याचं शूटिंग अजून सुरू व्हायचंय.

शिवाय करिनाकडे लाईफ इन मेट्रोचा सीक्वल आहे. त्यात ती अर्जुन कपूरसोबत आहे. बाँबे समुरायही पुढच्या वर्षी रिलीज होणार. त्यात नवाजुद्दीन, अक्षय खन्ना, फरहान अख्तर अशी तगडी फौज आहे.

करिनाचा पहिला सिनेमा कहो ना प्यार है ठरला असता. पण ऐन वेळी तिनं नकार दिला. पण ते बरंच झालं, असंही ती पुढे म्हणाली. कारण त्या सिनेमात फोकस फक्त हृतिक रोशनच होता. करिनाचा पहिला सिनेमा ठरला अभिषेक बच्चनसोबतचा रिफ्युजी.

अर्थात, आता काळ बदललाय. सोशल मीडियाचा फायदा स्टार्सना आता जास्त होतो. सारालाही तो तसा होणार. पदार्पणातच तीन सिनेमे नावावर करणारी सारा करिनाला तगडी स्पर्धा देईल, असं वाटतंय.

VIDEO : रणवीरसाठी लकी ठरली दीपिका, पहा कोणाला कुठला मिळाला अॅवाॅर्ड?

First published: December 18, 2018, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading