मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बॉलिवूड क्वीनच्या अडचणीत वाढ; कंगना रणौतविरोधात महाराष्ट्रात आणखी एक गुन्हा दाखल

बॉलिवूड क्वीनच्या अडचणीत वाढ; कंगना रणौतविरोधात महाराष्ट्रात आणखी एक गुन्हा दाखल

वादग्रस्त विधानं करून कंगना रणौत (kangana ranaut) प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असं या तक्रारीत म्हटलं आहे.

वादग्रस्त विधानं करून कंगना रणौत (kangana ranaut) प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असं या तक्रारीत म्हटलं आहे.

वादग्रस्त विधानं करून कंगना रणौत (kangana ranaut) प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असं या तक्रारीत म्हटलं आहे.

बेळगाव, 08 फेब्रुवारी : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून सोशल मीडियावर चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना (Kangana ranaut) रणौतच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. कंगनाविरोधात महाराष्ट्रात आणखी एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव येथील टिळकवाडी पोलिसात कंगनाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बेळगावमधील ॲड. हर्षवर्धन पाटील यांनी कंगनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंगना सातत्याने वादग्रस्त विधानं करून समाजात

जाणीवपूर्वक तेढ निर्माण करते, तिचं हे कृत्य समाज विघातक आहे. त्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. यासाठी आपण तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला, अशी माहिती ॲड. हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ॲड. हर्षवर्धन पाटील म्हणाले, "अभिनेत्री कंगना रणौतने सातत्याने वादग्रस्त विधान करून खळबळ माजवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः चित्रपट क्षेत्रातील विधानामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ माजवण्यात आला होता. आता दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी असं संबोधून तिने समस्त शेतकरी वर्गाचा अपमान केला आहे. समाजात गोंधळ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करून स्वतःच्या प्रसिद्धीचा खटाटोप चालवला आहे. तिची ही कृती समाजाची शांतता भंग करणारी आहे. त्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आपण गुन्हा नोंदवला आहे"

हे वाचा - लग्नाआधी सैफने अमृता सिंहला लिहिलं होतं पत्र; करीनासमोर गुपित उघडताच...

कंगनाविरोधात याआधी मुंबईतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वांद्रे आणि जुहू पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केलं होतं. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने कंगनाविरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणं या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात त्यांची चौकशीही झाली आहे.

हे वाचा - लग्नाच्या चर्चेत श्रद्धा कपूर देणार सरप्राइझ; Propose day दिवशीच शेअर केली पोस्ट

तर जुहू पोलीस ठाण्यात  कंगनाविरोधात जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी तक्रार केली आहे. कंगनानं मानहानी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. एका मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

First published:

Tags: Bollywood News, Kangana ranaut