कॉमेडी क्वीन भारतीचा 'प्री वेडिंग' म्युझिक व्हिडिओ पाहिलात का?

कॉमेडी क्वीन  भारतीचा 'प्री वेडिंग' म्युझिक व्हिडिओ पाहिलात का?

कॉमेडी क्वीन भारती सिंग 3 डिसेंबरला हर्ष लिंबाचियासोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. भारतीने नुकतीच तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती.

  • Share this:

21 नोव्हेंबर : कॉमेडी क्वीन  भारती सिंग 3 डिसेंबरला हर्ष लिंबाचियासोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. भारतीने नुकतीच तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती.भारतीने सोशल मीडियावर तिचे आणि हर्षचे अनेक फोटो शेअर केले. त्यातच आता तिने एक 'प्री-वेडिंग' म्युझिक व्हिडिओही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

त्या दोघांचा हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघांच्या निखळ प्रेमाची कहाणी दाखवली आहे. या व्हिडिओत ते दोघे एकमेकांना प्रेमाची वचनं देताना खूपच सुंदर दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच भारतीने तिचे 'ब्राइडल शॉवर'चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यातही या दोघांचा जोडा  शोभून दिसत आहे.

हर्षनेही त्याच्या सोशल अकाऊंटवर त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे भारती लग्नाच्या तयारीत चांगलीच व्यस्त झाली आहे. ती तिच्या इंस्टा अकाऊंटवरून शॉपिंगबद्दल अनेक गोष्टी शेअर करत असते. भारती नुकतीत तिच्या होणाऱ्या पतीच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी अमृतसरला जाऊन आली आहे. दोघेही पंजाबच्या गोल्डन टेंपलमध्येही गेले होते. त्याचे अनेक फोटो भारतीने शेअर केले आहेत.

भारतीला तिच्या लग्नासाठी आमच्याकडून खूप-खूप शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 01:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading