Home /News /entertainment /

Jholjhal Marathi Movie: मल्टीस्टारर चित्रपटात नक्की 'झोलझाल' कोण करतय? 'या' दिवशी होणार उलगडा

Jholjhal Marathi Movie: मल्टीस्टारर चित्रपटात नक्की 'झोलझाल' कोण करतय? 'या' दिवशी होणार उलगडा

मनोरंजनाची आणि हास्याची मेजवानी 'झोलझाल' (Jholjhal Marathi Movie ) या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला घेऊन येण्यास 'युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन' सज्ज होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे (JholJhal) पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

    मुंबई, 28 मे- विनोदाची मेजवानी हे महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. अशाच मनोरंजनाची आणि हास्याची मेजवानी 'झोलझाल'  (Jholjhal Marathi Movie ) या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला घेऊन येण्यास 'युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन' सज्ज होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे (JholJhal) पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर, दादर येथे चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. चित्रपटगृहात प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास हा चित्रपट येत्या 1 जुलैला ( Jholjhal release date ) संपूर्ण महाराष्ट्रात सज्ज होत आहे. 'झोलझाल' चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. हास्याची कारंजे घेऊन हे कलाकार रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला येत्या 1 जुलैला येत आहेत. या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार साकारणार असून या कलाकारांच्या भूमिका या निव्वळ पर्वणीच ठरतील यांत शंकाच नाही. अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत 'युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन' अंर्तगत 'झोलझाल' चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून निर्मित निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी उत्तमरित्या पेलली आहे. माननीय अमेय खोपकरजी चित्रपटाचे वितरक म्हणून जबाबदारी पेलवत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरवरील या मल्टीस्टारर चित्रपटात नक्की झोल कोण करतय? आणि काय करतंय ? हे पाहण्यासाठी येत्या 1 जुलैला चित्रपटगृहात जायला विसरू नका.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या