मुंबई, 31 जानेवारी : बॉलिवूड सेलेब्रिटीजप्रमाणेच टेलिव्हिजन स्टार आणि रिअॅलिटी शोजमधले स्टार्सही त्यांच्या खासगी जीवनातल्या घडमोडी नेहमीच सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत असतात. अभिनय, संगीत असो अथवा स्टँडअप कॉमेडी प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल करावं लागतं. स्ट्रगलमधून मिळालेलं यश नक्कीच प्रोत्साहन देणारं असतं. सध्या असंच यश मिळवलेला एक स्टँडअप कॉमेडियन जोरदार चर्चेत आहे.
एक कोटी रुपयांची एसयूव्ही कार खरेदी केल्यानंतर कारची डिलिव्हरी घेण्यासाठी हा कॉमेडियन अगदी साध्या वेशात आणि पायात चप्पल घालून शोरूममध्ये पोहोचला. याचा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्स केल्या. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता झाकिर खान यशाकडे वाटचाल करत आहे. त्याने नुकतीच नवी कोरी एसयूव्ही कार खरेदी केली आहे. या एसयूव्हीची किंमत एक कोटी रुपये आहे. विशेष बाब म्हणजे या कारची डिलिव्हरी घेण्यासाठी झाकीर शोरूममध्ये अगदी साध्या पेहरावात आणि चप्पल घालून पोहोचला. एवढ्या महागड्या गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी चप्पल घालून जाणं अनेकांना जरा विचित्र वाटलं. सोशल मीडियावर याचा फोटो शेअर होताच नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
झाकिर खानने नवी लँड रोव्हर रेंज रोव्हर वेलार खरेदी केली आहे. या एसयूव्हीमध्ये खास फीचर्स असतात. रेंज रोव्हर वेलार कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये मिळते. झाकीरने यापैकी कोणतंही मॉडेल खरेदी केलं असलं तरी त्याची ऑन रोड किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रेंज रोव्हर वेलार कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये आणि 2.0 लीटर इंजिनसह मिळते.
पेट्रोल युनिट 247bhp आणि 365 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. डिझेल व्हॅरिएंट 201 bhp आणि 430 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या दोन्ही व्हॅरिएंटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. अशी वैविध्यपूर्ण फीचर्स असलेली महागडी कार झाकीरने खरेदी केली; मात्र कारची डिलीव्हरी घेण्यासाठी तो चप्पल घालून शोरूममध्ये गेल्याने अनेकांना ही गोष्ट काहीशी विचित्र वाटली आहे.
रिक्षावाल्याची मुलगी बनली मुंबईची Gully Girl, हिजाब घालून करते रॅप Video
झाकीरचा धाकटा भाऊ आणि गायक झीशान खानने झाकीरचा गाडीसोबतचा फोटो शेअर करून सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये झीशानने नवीन लक्झरी एसयूव्हीची डिलिव्हरी घेण्यासाठी चप्पल घालून गेल्याबद्दल भावाला टोमणा मारला आहे. झीशान पोस्टमध्ये लिहितो, `घरात नवीन पाहुणा आल्याबद्दल अभिनंदन झाकीर. तशी ही गाडी तर मीच चालवणार आहे. त्यामुळे मीच माझं अभिनंदन करतो आणि भावा रेंज रोव्हर घ्यायला कोणी चप्पल घालून जातं का?`
View this post on Instagram
झीशानच्या या प्रश्नावर अनेक युझर्सनी उत्तर देऊन झाकीरच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. एका युझरने म्हटलं आहे, `भाईजान, ज्याच्याकडे पैसे असतात तेच अशी साधी चप्पल घालून गाडी घ्यायला जातात.` अन्य एका युझरने म्हटलं आहे, की `चप्पल घालून रेंज रोव्हर फक्त तेच विकत घेतात, ज्यांच्यासाठी रेंज रोव्हर ही फार मोठी गोष्ट नाही.`
'पाणी कसं प्यायचं हेच शिकायला पाऊण तास लागला', मकरंद अनासपुरेंनी सांगितला मुंबईतील 'तो' किस्सा
झाकीरची व्यावसायिक कारकिर्द देखील जोरात सुरू आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर `तथास्तु` नावाचा नवा स्टँडअप स्पेशल शो सुरू केला आहे. तो लवकरच त्याच्या यू-ट्यूब चॅनेलवर `फर्जी मुशायरा` या कॉमेडी शोचा तिसरा सीझन सुरू करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment