• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • कास्टिंग काऊचमध्ये महिलाच आधी पुढाकार घेतात - कॉमेडियन कृष्णा

कास्टिंग काऊचमध्ये महिलाच आधी पुढाकार घेतात - कॉमेडियन कृष्णा

प्रत्येक अभिनेत्रीने आपला अनुभव सगळ्यांसमोर शेअर केला. तर काहींनी मात्र महिलांनाच यात दोषी ठरवलं. असंच काहीस वक्तव्य कॉमेडियन अभिनेता कृष्णा याने केलं आहे.

  • Share this:
04 मे : कास्टिंग कोऊचवर बोलतान सिनेजगतातून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. प्रत्येकाने आपलं वेगळं मत मांडलं. प्रत्येक अभिनेत्रीने आपला अनुभव सगळ्यांसमोर शेअर केला. तर काहींनी मात्र महिलांनाच यात दोषी ठरवलं. असंच काहीस वक्तव्य कॉमेडियन अभिनेता कृष्णा याने केलं आहे. कास्टिंग काऊचमध्ये मुलीच आधी पुढाकार  घेतात असं वादग्रस्त विधान त्यांने केलं आहे. याविषयी बोलताना कृष्णा म्हणाला की, 'बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचसारखी प्रकरणं होत नाही. हा सगळा एक फसवण्याचा डाव आहे. कास्टिंग काऊचमध्ये आधी महिलाच आधी पुढाकार  घेतात आणि नंतर समोरच्यावर नाव ढकलतात.' एका मुलाखती दरम्यान त्याने हे वक्तव्य केलं आहे. तो पुढे म्हणाला की, 'कॉर्पोरेट क्षेत्रात कास्टिंग काऊचसारखी प्रकरण जास्त प्रमाणात होतात. पण आमच्यावरच नेहमी आरोप केले जातात कारण आम्ही मीडियावाले आहोत.' जर व्हायचंच असतं ना तर कास्टिंग काऊच कॉलेजमध्येही झालं असतं. असंही तो म्हणाला आहे. त्याच्या या विधानावर आता महिला आणि कास्टिंग काऊचवर आपला अनुभव सांगणाऱ्या महिला काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
First published: