मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विमानतळावर कपिल शर्माचं निंदनीय वर्तन; फोटो काढला म्हणून दिली शिवी, पाहा VIDEO

विमानतळावर कपिल शर्माचं निंदनीय वर्तन; फोटो काढला म्हणून दिली शिवी, पाहा VIDEO

मुंबई विमानतळावर मीडियाच्या कॅमेऱ्यांना पाहून कपिल शर्माची (kapil sharma) जीभ घसरली आहे. त्याने कॅमेरापर्सनला दूर राहण्यास सांगून शिवीही (Kapil sharma abused cameraman) दिली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 फेब्रुवारी: भारताचे प्रसिद्ध कॉमेडिन कपिल शर्माला (Kapil sharma) नुकतचं मुंबई विमानतळावर व्हीलचेयरवर (Wheelchair) स्पॉट करण्यात आलं आहे. यावेळी कपिलला कसली तरी दुखापत झाल्याचं कळालं आहे. पण त्याला नेमकं काय झालंय याचं कारण कळू शकलं नाही. पण विमानतळावर मीडियाच्या कॅमेऱ्यांना पाहून त्याची जीभ घसरली आहे. कॅमेरापर्सनला दूर राहण्यास सांगून कपिलने त्याला शिवीही (Kapil sharma abused cameraman) दिली आहे. संबंधित कॅमेरामनने त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral video) होताना दिसत आहे.

अलीकडेच कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' बंद पडला आहे. अशातच त्याने एका कॅमेरामनला शिवी दिल्याने त्याने आणखी एक वाद ओढावून घेतला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कपिलचा मॅनेजर मीडिया फोटोग्राफर्सना त्यांची प्रकृती लक्षात घेवून संबंधित शिवीगाळ केलेला व्हिडिओ हटवण्यास सांगताना दिसत आहे. पापाराझी फोटोग्राफर वीरेंद्र चावलाने हा व्हिडिओ शेअर केला असून त्याने घडलेल्या सर्व प्रसंगांची माहिती सांगितली आहे.

वीरेंद्र चावला यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, जेव्हा आम्ही कपिलचा फोटो काढण्यासाठी पुढे सरसावलो, तेव्हा कपिलच्या बॉडीगार्डने आम्हाला धक्काबुक्की केली. यावेळी फोटोग्राफर्स म्हणाले की, आम्हाला कपिलशी बोलायचं आहे. त्यानंतर कपिलनेच फोटोग्राफर्सना दूर राहायला सांगत 'उल्लू का पट्ठा' अशी शिवी दिली आहे. त्याचा हा शिवी दिलेला व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

हे ही वाचा -काँग्रेस आमदार आणि कंगना रणौतच्या वादात स्वरा भास्करची उडी, दोघांनाही झापलं

खरंतर अशा प्रकारे वर्तणूक करण्याची कपिल शर्माची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर त्याच्या संपूर्ण टीमसोबत वाद घातला होता. त्यानंतर सुनील ग्रोव्हर, अली असगर यांच्यासह कपिलची संपूर्ण टीम त्याच्यापासून दूर गेली होती. असं असताना आता या नवीन घटनेमुळं तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

First published:

Tags: Bollywood News, Kapil sharma