दुसऱ्यांदा बाबा होणार कपिल शर्मा, Baby Bump लपवताना दिसली पत्नी गिन्नी?

दुसऱ्यांदा बाबा होणार कपिल शर्मा, Baby Bump लपवताना दिसली पत्नी गिन्नी?

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) लवकरच त्याच्या कुटुंबात एका नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) लवकरच त्याच्या कुटुंबात एका नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहे. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी (Ginni Chatrath) पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याची बातमी समोर येत आहे. मीडिया अहवालानुसार शर्मा कुटुंबांत जानेवारी 2021 मध्ये या नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. या दरम्यान कपिल शर्माची आई देखील मुंबईत दाखल झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. कपिल शर्मा आणि गिन्नीने 2019 च्या डिसेंबर महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. कपिल शर्मा नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

काही दिवसांपूर्वी करवा चौथचा सण साजरा करताना कॉमेडियन भारती (Bharati) इन्स्टाग्रामवर लाइव्ह होती. त्यामध्ये  गिन्नी देखील पाहायला मिळाली आणि या व्हिडीओमध्ये गिन्नीचं बेबी बंप (Baby Bump) दिसत आहे.

दरम्यान शर्मा कुटुंबाकडून अद्याप याबाबत कोणती अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. मात्र सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये देखील गिन्नी बेबी बंप लपवताना दिसली. कपिल शर्माने दिवाळी दरम्यान चाहत्यांना शुभेच्छा देताना काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये देखील गिन्नी बेबी बंप लपवताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिल शर्मा आणि गिन्नी यांच्या पहिल्या गोंडस मुलीचं नाव अनायरा आहे. अनायरा पुढील महिन्यात 10 तारखेला वर्षाची होईल, तर 12 डिसेंबरला कपिल आणि गिन्नी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करणार आहेत. एकंदरित येणारे काही महिने शर्मा कुटुंबीयांसाठी सिलेब्रेशनचे असणार आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 20, 2020, 11:43 AM IST

ताज्या बातम्या