मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘कोरोना तुझा काका आहे का?’ पाहा जॉनी लिव्हरच्या मुलीनं केली कोणाची नक्कल

‘कोरोना तुझा काका आहे का?’ पाहा जॉनी लिव्हरच्या मुलीनं केली कोणाची नक्कल

कॉमेडियन जॅमी लिव्हरचे व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून  हसाल

कॉमेडियन जॅमी लिव्हरचे व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल

कॉमेडियन जॅमी लिव्हरचे व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल

  • Published by:  News Digital

मुंबई 8 जून :  विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांनी आजवर आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखून हसण्यास भाग पाडलं. पण त्यांच्याइतकीच विनोदी बुद्धी त्यांच्या मुलीकडे म्हणजेच जॅमी लिव्हरकडेही (Jamie Lever) आहे. सोशल मीडियावर ती विविध व्यक्तिंच्या मीमिक्री करून मजेशीर व्हिडीओ बनवत असते. आताही तिने असाच एक गमतीशीर व्हिडीओ बनवला आहे.

यावेळी तिने चक्क ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) वर ही मीमिक्री केली आहे. विशेष म्हणजे जॅमीने अगदी राखीसारखे सगळे हावभाव करत हा भन्नाट व्हिडीओ बनवला आहे. सोशल मीडियावर काहीच काळात हा व्हिडिओ तुफान लोकप्रिय होताना दिसत आहे. राखी सध्या सतत चर्चेत आहे ती म्हणजे तिच्या सतत फिरण्यामुळे. लॉकडाउन काळातही राखी अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर स्पॉट व्हायची. त्यावेळी काही मीडिया तिला स्पॉट करत असे. तेव्हा तिच्या हटके स्टाईलमध्ये ती काही संवादही साधायची.

यावरच जॅमीने हा भन्नाट व्हिडीओ बनवला आहे. यानंतर जॅमीला अनेक कमेंट्स देखील मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे यावर खुद्द राखीनेही कमेंट केली आहे. व तिलाही हा व्हिडीओ आवला आहे. त्यावर जॅमीने देखिल तिला रिप्लाय केला आहे. (Jamie Lever funny video)

जॅमी ही एक कॉमेडियन असून काही कॉमेडी शोमध्येही ती दिसली होती. याशिवाय ‘किस किसको प्यार करू’, ‘हाउसफुल 4’ या चित्रपटांतही ती विनोदी भूमिकेत दिसली होती.

अभिनेत्री एव्हलिन शर्मा अडकली विवाह बंधनात; शेअर केले पतीसोबतचे खास फोटो

जॅमीचा विनोदी अभिनय सोशल मीडियावरही चांगला पसंत केला जात आहे. याआधीही तिने काही व्हिडीओस बनवले होते. अभिनेत्री कंगना राणौतचीही तिने मीमिक्रि केली होती. तसेच ती सोशल मीडियावरही फार सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंगही आहे.

First published:

Tags: Actor, Entertainment