मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुगंधा मिश्रानं संकेत भोसलेसोबत साखरपुडा केला? अखेर अभिनेत्रीनंच सांगितलं सत्य

सुगंधा मिश्रानं संकेत भोसलेसोबत साखरपुडा केला? अखेर अभिनेत्रीनंच सांगितलं सत्य

संकेत-सुगंधाच्या साखरपुड्याची बातमी खरी आहे का? अभिनेत्रीनं सांगितलं व्हायरल बातमी मागचं सत्य

संकेत-सुगंधाच्या साखरपुड्याची बातमी खरी आहे का? अभिनेत्रीनं सांगितलं व्हायरल बातमी मागचं सत्य

संकेत-सुगंधाच्या साखरपुड्याची बातमी खरी आहे का? अभिनेत्रीनं सांगितलं व्हायरल बातमी मागचं सत्य

मुंबई, 18 एप्रिल : कॉमेडियन सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) आणि संकेत भोसले (Sanket Bhosale) यांच्या एन्गेजमेंटची (Engangement) बातमी नुकतीच वाऱ्यासारखी परसली होती. पण आता याबद्दल नवी बातमी समोर येत आहे. कॉमेडियन सुंगधानेच यावर खुलासा कोला आहे. ‘सा रे ग म प’ या रियॅलिटी शो मधून गायिका म्हणून नावारुपास आलेली सुंगधा एक उत्तम विनोदवीर देखील  आहे. ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma show)  मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते.

नुकतेच संकेत आणि सुंगधाने त्यांच्या सेशल मीडिया (social media) हॅन्डल वर काही रोमॅन्टीक फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. तर फोटोला एन्गेजमेंटचं कॅप्शनही दिलं होतं. तर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. पण एका बेवसाइटला दिलेल्या मुलाखतीत सुंगधा ने काही वेगळी माहीती दिली आहे, व आपला साखरपुडा झाला नसल्याचं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by . (@drrrsanket)

सुंगधा ने संकेत सोबत असलेल्या नात्यावरही चर्चा केली. सुंगधाने सांगितलं अजून आमची एन्गेजमेंट झाली नसून हे फोटो प्रीवेडींग फोटोशुट आहे. अजून आमचा साखरपुडा व्हायचा आहे.

View this post on Instagram

A post shared by (@sugandhamishra23)

26 एप्रिल ला आम्ही विवाहबंधनात अडकणार आहोत. जालंधर मध्ये माझं घर आहे. आणि तिथेच आमचा विवाह होणार आहे. तसेच साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी होणार आहे. कोरोना सदृश (pandemic)  परिस्थिती पाहता फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य , जवळचे नातेवाईक आणि मित्र यांच्या समवेत लग्न करणार असल्याचं तिने म्हटलं आहे. तर अतिशय वैयक्तिक रित्या सोहळा (private ceremony) पार पडणार असल्याचही तिने पुढे सांगितले.

ऐश्वर्या, आलिया, करीना; कार्तिक आर्यनप्रमाणे बडे बॉलिवूड स्टार्सही फिल्ममधून झाले होते आऊट

संकेत भोसले हा ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये संजय दत्तचं (Sanjay Dutt) पात्र साकारायचा. तर सुगंधा निरनिराळ्या पात्रात प्रत्येक भागात दिसून येते. याशिवाय संकेत ‘बाबा की चौकी’ (Baba ki chauki)  नावाचा शो देखिल होस्ट करत होता, कॉमेडीयन सुनिल ग्रोव्हरचा (Sunil grover)  शो ‘गँग्स ऑफ फिल्मीस्तान’ (Gangs of filmistan) मध्येही तो दिसला होता.

First published:
top videos

    Tags: Entertainment, The kapil sharma show