Home /News /entertainment /

आई होण्यासाठी कॉमेडियन भारती सिंगनं घटवलं 25 किलो वजन; जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन

आई होण्यासाठी कॉमेडियन भारती सिंगनं घटवलं 25 किलो वजन; जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन

Bharati Singh Diet Plan: आई होण्यासाठी भारतीनं आपलं वजन कमी (Weight loss) करण्याचं अत्यंत कठीण आव्हान (Challenge) यशस्वीपणे पार केलं आहे. भारतीचं हे परिवर्तन थक्क करणारं होतं.

नवी दिल्ली 13 डिसेंबर : विनोदी कलाकार अर्थात कॉमेडियन (Comedian) म्हणून छोटा पडदा गाजवणारी भारती सिंग (Bharati Singh) आज जगभरात प्रसिद्ध आहे. महिला कॉमेडियन (Woman Comedian) म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी भारती सिंग अफलातून टायमिंग, हजरजबाबीपणा, अत्यंत उत्तम सादरीकरण या जोरावर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. आपल्या देशात महिला कॉमेडियन्स अगदीच मोजक्या आहेत. त्यात भारती सिंगनं अव्वल स्थान मिळवलं आहे. देशातच नव्हे तर जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. भारती सिंग छोट्या पडद्यावरील एका शोमधून प्रसिद्ध झाली. ती चांगलीच वजनदार असल्यानं तिच्या कॉमेडीमध्ये भर पडत असे. मात्र अलीकडेच भारती सिंगला पाहिल्यानंतर चाहत्यांना, प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. कारण भारती आता पूर्वीसारखी जाड, गोलमटोल राहिलेली नाही, तर ती एकदम बारीक (Slim) झाली आहे. एवढचं नव्हे तर ती आता आईही (Mother) होणार आहे. भारती आणि तिचा पती हर्ष यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून सर्वांना ही खुशखबर (Good News)दिली आहे. दैनिक जागरणने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 'सब बढिया, सब शानदार', Urvashi Rautela ने इस्रायलच्या माजी PM ना शिकवलं हिंदी आई होण्यासाठी भारतीनं आपलं वजन कमी (Weight loss) करण्याचं अत्यंत कठीण आव्हान (Challenge) यशस्वीपणे पार केलं आहे. भारतीचं हे परिवर्तन थक्क करणारं होतं. वास्तविक, गेल्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) भारतीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये भारती सिंह पूर्वीपेक्षा बारीक दिसत होती. कपिल शर्मा शोमध्ये (Kapil Sharma Show) आपल्या मुलीसोबत आलेल्या नीतू सिंगनेही (Neetu Singh) भारतीचे कौतुक केलं. अवघ्या काही महिन्यांत भारतीचे 15 किलो वजन कमी झालं होतं. यावेळी भारतीनं सांगितलं होतं की, जास्त वजनामुळे तिला आरोग्याशी संबंधित अनेक त्रासांना (Health Problems) सामोरं जावं लागत होतं. लग्नानंतर तिला आई व्हायचं होतं, त्यामुळे डॉक्टरांनी तिला कोणत्याही परिस्थितीत वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. याआधी भारतीचं वजन तब्बल 91 किलो होतं. आई होण्यासाठी वजन कमी करणे अत्यावश्यक असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तिनं ते आव्हान स्वीकारलं आणि वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. अतिशय कठोर परिश्रम करून तिनं आपलं वजन चक्क 76 किलोपर्यंत कमी केलं. वजन कमी करण्यासाठी तिनं कोणती पद्धत आजमावली माहिती आहे? भारतीनं वजन कमी करण्यासाठी कमनीय बांध्यासाठी, फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty)पद्धत आजमावली. भारतीने शिल्पाप्रमाणेच इंटरम‍िटेंट फास्टिंगचा (Intermittent Fasting) मार्ग वापरला आणि त्याचा परिणाम सर्वांना दिसतोच आहे. स्वतः भारतीनंच याबाबत माहिती दिली आहे.

सैफ अली खानच्या मुलाला Alia Bhatt ने केलं रिजेक्ट...' या Pooचा VIDEO पाहिलात का?

वजन कमी करण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले, कसे डाएट (Diet)केलं याची माहिती भारतीनं दिली. तिने आहारावर नियंत्रण ठेवून 15 किलोपर्यंत वजन कमी केले. ती संध्याकाळी 7 नंतर आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 पर्यंत काहीही खायची नाही. यालाच इंटरम‍िटेंट फास्टिंग म्हणतात. आहारात ठराविक वेळेचे अंतर ठेवल्याने वजन झपाट्याने कमी होते. बरेच लोक 12 आणि 16 तासांचे इंटरम‍िटेंट फास्टिंग करून वजन नियंत्रित करतात. भारतीनंही हाच मार्ग वापरून आपलं वजन चक्क 25 किलो कमी केलं असून आई होण्याचं तिचं स्वप्नही यामुळे साध्य झालं आहे. भारतीनं आपलं वजन कमी करून अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. तिच्या लोकप्रियतेत यामुळे आणखी भर पडली आहे.
First published:

Tags: Health Tips, Weight loss

पुढील बातम्या