Home /News /entertainment /

Oh no! झोपाळ्यावर बसली 75 किलोची Bharti Singh, झुलता झुलता झाली दुर्घटना; VIDEO VIRAL

Oh no! झोपाळ्यावर बसली 75 किलोची Bharti Singh, झुलता झुलता झाली दुर्घटना; VIDEO VIRAL

भारतीच्या(Bharti singh latest news) फॅनपेजनं शेअर केलेला एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

  मुंबई, 25 जून : सगळ्यांना आपल्या विनोदी शैलीनं खळखळून हसवणारी (Comedian Bharti singh)काॅमेडीयन म्हणजे भारती सिंह. भारती सिंह (Bharti Singh)आपल्या खास विनोदांनी प्रेक्षकांना मनसोक्त हसवते. कधीही, कुठेही भारती आपल्या हटक्या शैलीत विनोदाचे बाॅम्ब फोडत असते. याशिवाय भारती सोशल मीडियावर काॅमेडी व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. त्यामुळे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. भारतीचे फॅनपेजही(Bharti Fanpage) तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतंच भारतीच्या एका फॅनपेजनं भारतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. भारतीच्या(Bharti singh latest news) फॅनपेजनं शेअर केलेला एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भारती एका झोक्यावर बसून मस्त आरामशीर झोका खेळत आहे. झोका खेळता खेळता तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. ती खाली पडल्यानं तिला थोडा हिसका बसल्याचं दिसून येतंय. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. तुला जास्त लागलं तर नाही ना?, तुम्ही ठीक आहात ना? , अशा प्रकारच्या कमेंट करत काळजी व्यक्त करत आहे. हेही वाचा - Veena Jagtap: वीणा जगतापची सेटवरची बेस्ट फ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री, पाहा हा खास video भारती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. चाहत्यांना तिच्या खासगी आणि वैयक्तिक आयुष्याविषयी सांगत असते. व्लाॅग शेअर करत ती चाहत्यांना तिच्याविषयी सांगत असते. चाहतेही तिच्या व्लाॅगची आतुरतेनं वाट बघत असतात. व्हिडीओवर भरभरुन प्रेम देतात. लाईक्स आणि कमेंटचाही वर्षाव करतात.
  दरम्यान, भारती आता आई झाली असून तिनं एका गोंडस मुलगा झाला आहे. आता ती त्याची काळजी करण्यात व्यस्त झाली आहे. भारती तिच्या कामाविषयी खूप मेहनती आहे हे अनेकवेळा पहायला मिळालं आहे. गर्भवती असतानाही ती शूट करत होती. त्यामुळे अनेकांनी तिचं कौतुक केलं.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Comedian, Entertainment, Video viral

  पुढील बातम्या