मुंबई, 09 डिसेंबर: अभिनेत्री आणि कॉमेडियन भारती सिंह (Bharati Singh) तिच्या कॉमेडीच्या टायमिंगसाठी तसंच दिलखुलास स्वभावासाठी ओळखली जाते. अगदी कमी वेळातच तिने विविध कॉमेडी आणि रिअॅलिटी शो मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. दरम्यान भारतीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मीडिया अहवालानुसार, पुढील वर्षात भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) आई-वडील (Bharti Singh and Haarsh Limbachiyaa Expecting their first baby) बनणार आहेत. दरम्यान भारती किंवा हर्ष दोघांकडूनही अद्याप याबाबक कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार हर्ष-भारतीच्या घरी चिमुकला पाहुणा येण्याची शक्यता आहे.
भारती सिंग तशी नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. मात्र सध्या ती तिच्या ट्रान्सफर्मेशनमुळे विशेष चर्चेत आहे. तिच्या फॅट टू फिट प्रवासाचे सर्वजण कौतुक करत आहेत. त्यामुळे अशी देखील माहिती समोर आली आहे की गर्भावस्थेसाठी तिने वजन कमी केले आहे. सध्या ती बेड रेस्ट करत असून काही वेळाने काम सुरू करणार आहे. एचटीच्या अहवालानुसार या कपलच्या एका जवळच्या व्यक्तीने अशी माहिती दिली आहे की, सध्या भारतीने सगळे प्रोजेक्ट्स देखील थांबवले आहेत. ती सध्या लो प्रोफाइल राहत असून त्यामुळे घरातून देखील बाहेर पडत नाही आहे.
View this post on Instagram
मीडिया अहवालात भारतीने यावर दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, तिने या वृत्ताचे खंडन केलेले नाही. तिने असे म्हटले आहे की- मी याबाबत पुष्टी करणार नाही. मात्र योग्यवेळी याबाबत सविस्तर माहिती देईन. अशा गोष्टी लपून राहत नाही. जेव्हा मला सांगणं योग्य वाटेल तेव्हा स्वत:हून मी हे जाहीर करेन.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.