मुंबई, 28 नोव्हेंबर: कॉमेडिअन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिच्या नवऱ्याला ड्रग्ज प्रकरणामधून जामिन मिळाला असला तरी तिच्या अडचणी संपलेल्या नाहीत. ड्रग्ज प्रकरणामुळे (Drug Case) तिची प्रतिमा मलिन झाली आहे. गेल्या काही दिवसात भारती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. त्यामुळे ‘द कपिल शर्मा शो’मधून (The Kapil Sharma Show) तिला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
चॅनलची भूमिका काय?
सोनी टीव्ही (Sony TV)ने याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘द कपिल शर्मा शो’ हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे. त्यात भारतीच्या असण्यामुळे नवे वाद निर्माण होतील. अशी चॅनलची बाजू आहे. पण या निर्णयाला कपिल शर्माचा मात्र विरोध आहे.
View this post on Instagram
नेमकं प्रकरण काय?
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) यांच्या घरी काही दिवसांपूर्वी एनसीबीने छापेमारी केली होती. त्यांच्या घरातून ग्रॅमपेक्षा जास्त गांजाही जप्त करण्यात आला होता. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau) कॉमेडियन आणि तिचा नवरा दोघांनाही अटक केली होती. दरम्यान अटक आणि त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर भारती सिंहने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने शूटिंगला पुन्हा सुरुवात केल्याचं दिसत होतं. बेल मिळाल्यानंतर तिने सर्वात आधी गणपतीचे स्मरण केले होते, तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये बाप्पाचा फोटो आणि आरती देखील शेअर केली होती. पण भारती आता किती दिवस शूटिंग करणार? प्रेक्षक तिला कशा पद्धतीने स्वीकारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.