मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO:अवघ्या काही महिन्यात भारतीने घटवलं 15 किलो वजन; चाहत्यांना सांगितलं आपलं डाएट प्लॅन

VIDEO:अवघ्या काही महिन्यात भारतीने घटवलं 15 किलो वजन; चाहत्यांना सांगितलं आपलं डाएट प्लॅन

अवघ्या काही महिन्यांमध्ये भारतीने चक्क 15 किलो वजन कमी केलं आहे.

अवघ्या काही महिन्यांमध्ये भारतीने चक्क 15 किलो वजन कमी केलं आहे.

अवघ्या काही महिन्यांमध्ये भारतीने चक्क 15 किलो वजन कमी केलं आहे.

मुंबई, 14 सप्टेंबर- टीव्हीवर पुन्हा एकदा 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) ला सुरुवात झाली आहे. त्यामुळे चाहते खूपच आनंदात आहेत. यावेळी शोमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. अजूनही शोमध्ये सुमोना चक्रवर्तीची एन्ट्री झालेली नाहीय. मात्र कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरीची एन्ट्री झाली आहे. तसेच शोमध्ये भारती सिंग(Bharati Singh) एका नव्या रूपात दिसून येत आहे. भारतीने आपलं वजन(Weight Loss) मोठ्या प्रमाणात कमी केलेलं दिसत आहे. तिने नुकताच मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वेट लॉसचं सिक्रेट सांगितलं आहे.

भारती सिंगने नुकताच मीडियाला मुलाखत देत आपण वजन कमी केल्याच्या बातम्यांवर शिक्का मोर्तब केला आहे. पापाराझी विरल भयानीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये भारती सिंग आपल्या वेट लॉसबद्द्दल मोकळेपणाने सांगत आहे. भारतीने स्वतः सांगितलं कि तिने १५ किलो वजन कमी केलं आहे.

व्हायरल होत मध्ये भरती सिंग सांगत आहे, 'मला सर्व चॅनेलचे लोक, सोशल मीडियावाले फोन करून विचारत आहेत. वजन कस कमी केलं याबद्दल. मी सर्वांना हेच सांगत आहे एकाला मी सांगितलं तेच सर्वांनी लिहा. मी पुन्हा एकदा सर्वांना हेच सांगेन मी वजन कमी करण्यासाठी कोणतीही जिम केली नाही, किंवा योगा क्लास केला नाही. मी फक्त इंटरमिंटेन्ट डाएट फॉलो करत आहे.'

(हे वाचा:सिद्धार्थच्या मृत्यूनंतर कशी आहे शेहनाजची अवस्था? अभिनव शुक्लाने दिली माहिती)

भारती पुढं सांगते, 'या डाएटनुसार मी सायंकाळी ७ नंतर काहीही खात नाही. मी थेट दुसऱ्या दिवशी १२ वाजता खाते. मात्र यामध्येही मी पराठा वगैरे सर्वकाही खाते. मी शेवटी पंजाबी आहे. मला सॅलड आणि फळेवगैरे खाऊन डाएटवर राहणं शक्य नाही. त्यामुळे मी सर्वकाही खाते मात्र सायंकाळी ७ ला सर्वकाही बंद करते'.

(हे वाचा:नारीशक्ती' म्हणत रिया चक्रवर्तीने शेअर केला ग्लॅमरस लुक, चाहत्यांनी केलं कौतुक)

भारती सिंगमध्ये खरंच खूप बदल दिसून येत आहे. चाहते तिला पाहून हैराण होत आहेत. अवघ्या काही महिन्यांमध्ये भारतीने चक्क १५ किलो वजन कमी केलं आहे. त्यामुळे सर्वांनाच तिची वेट लॉस जर्नी जाणून घेण्याची इच्छा होत आहे.

First published:
top videos

    Tags: Comedy, Entertainment, The kapil sharma show