मुंबई, 15 जुलै- छोट्या पडद्यावरील लाफ्टर क्वीन म्हणून भारती सिंगला (Bharati Singh) ओळखलं जातं. भारती आपल्या विनोदी वृत्तीने सर्वांनाचं पोट धरून हसायला भाग पाडते. पडद्यावर भारती नेहमीचं सर्वांना हसवत असते. त्यामुळे तिला पाहून सर्वांनाचं वाटतं की तिच्या आयुष्यात सर्व ठीक आहे, किंवा तिला काहीच दुख नाहीय. मात्र आपलं दुख आणि अश्रू लपवणं ही देखील एक कला आहे. नुकताच भारतीने आपलं दुख सर्वांनासमोर मांडलं होतं. मनीष पॉलच्या (Manish Poul) पॉडकास्ट शोमध्ये भारतीने आपलं मन मोकळ केलं होतं. यावेळी बोलताना भारतीने सांगितलं आहे, की का ती अजूनही आपल्या वडिलांचा फोटो आपल्या घरामध्ये लाऊ देत नाही.
View this post on Instagram
मुलगी आणि वडिलांचं नातं जगातील सर्वात सुंदर नातं असतं. मात्र भारती सिंगला आपल्या वडिलांचं प्रेम कधी मिळूच शकलं नाही. पुढे जाऊन आपला भाऊ ती उणीव भरून काढेल असं भारतीला वाटत होतं. मात्र तिथेही तिला निराशाचं मिळाली. कामकाजामध्ये भावाकडूनही तिला वडिलांचं प्रेम मिळू शकलं नाही. भारतीने मनीषच्या पॉडकास्ट शोमध्ये या गोष्टींचा खुलासा केला आहे.
View this post on Instagram
मनीष पॉलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या शोचा टीझर शेयर केला आहे. यामध्ये भारती सांगताना दिसते, की तिच्या आयुष्यामध्ये तिची आईचं सर्वकाही आहे. 2 वर्षांची असतानाचं तिचे वडील हे जग सोडून गेले होते. तिला वडिलांचं प्रेम कधीचं नाही मिळालं. तिच्याबहीण भावाने वडिलांना बघितल आहे. पण भारती 2 वर्षांची असल्याने काहीचं शक्य झालं नव्हतं. भारती म्हणते, ‘आमच्या घरात वडिलांचा एकही फोटो नाही आणि तो मी लाऊही देत नाही. भावाकडूनसुद्धा ते प्रेम मिळू शकलं नाही. सगळे आपापल्या कामामध्ये व्यग्र झाले होते. जेव्हा मला पतीचं प्रेम मिळालं तेव्हा समजलं एक मुलगा आपल्यावर प्रेम करतो तेव्हा कसं वाटतं’.
(हे वाचा:'मला लग्नही करायचंय आणि मुलंही हवीत';कतरिनाने सांगितली लग्नासाठी कोणती वेळ योग्य )
मनीष पॉलने आपल्या पोस्टला चार्ली चाप्लीनचं कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘मला पावसात भिजायला आवडतं, कारण मला कोणी रडताना बघू नये- चार्ली चाप्लीन...जो लोग आपको बहोत हसते है उनमें दर्द भी बहोत होता हैं, ते लोक आपलं दुख लपवत असतात. अशीच भारती सिंगसुद्धा आहे. ती हास्याची महाराणी आहे. आणि मला आनंद आहे, की तिने माझ्यासोबत आपलं हे दुख वाटलं. भारतीची ही स्टोरी पाहण्यासाठी शुक्रवारी बघा माझा पॉडकास्ट शो’. मनीषने अजूनपर्यंत 4 एपिसोड केले आहेत. यावरून समजतं की अजूनही काही कॉमेडीयन आश्चर्यकारक खुलासे करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actress