'साराभाई vs साराभाई' वेबसीरिजसोबत मालिका रूपातही परतणार

'साराभाई vs साराभाई' वेबसीरिजसोबत मालिका रूपातही परतणार

साराभाई कुटुंबाचं कमबॅक फक्त 10 वेब एपिसोडसाठी मर्यादित न ठेवता ती मालिका म्हणून छोट्या पडद्यावर पुन्हा आणावी असा विचार केला जातोय.

  • Share this:

12 एप्रिल : 2004 ते 2006 दरम्यान छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका 'साराभाई वर्सेस साराभाई' 7 वर्षांच्या लीपनंतर वेब सीरिज म्हणून परतणार हे तर जगजाहीर आहे.मालिका बंद होऊन 11 वर्ष झाली असली तरी मालिकेची लोकप्रियता तेवढीच आहे.

याचा अंदाज या मालिकेच्या निर्मात्यांना नुकताच आला.मालिकेच्या संपूर्ण कास्टसोबतचा एक नवा व्हिडिओ नुकताच शेअर केला गेला आणि बघता बघता व्हिडिओला 24 तासात तब्बल 24 लाखांच्या वर व्ह्यूज् मिळाले.

त्यामुळे साराभाई कुटुंबाचं कमबॅक फक्त 10 वेब एपिसोडसाठी मर्यादित न ठेवता ती मालिका म्हणून छोट्या पडद्यावर पुन्हा आणावी असा विचार केला जातोय.असं झाल्यास मालिकेच्या फॅन्ससाठी ही एक सुखद बातमी ठरेल हे निश्चित.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2017 05:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading