Home /News /entertainment /

राजा राणीची गं जोडी' मालिकेत न्यू एंट्री, पण ही अभिनेत्री आहे तरी कोण ?

राजा राणीची गं जोडी' मालिकेत न्यू एंट्री, पण ही अभिनेत्री आहे तरी कोण ?

'राजा राणीची गं जोडी' मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. ही अभिनेत्री कोण याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

  मुंबई, 7 डिसेंबर- 'राजा राणीची गं जोडी'  (raja rani chi g jodi) ही मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान  (raja rani chi g jodi latest episode)  बनवलं आहे. संजीवनी आणि रणजीत यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांच्या नात्याने आतापर्यंत अनेक संकटाना तोंड दिलं आहे. , या संकट काळात दोघांनीही त्यांची साथ कधीच सोडली नाही. आता कुठे या दोघांच्या संसारातील अडचणी दूर होत सुखाचे दिवस आले आहे. मात्र, पुन्हा एकदा या दोघांच्या सुखी संसाराल नजर लागली आहे. आता या दोघांत तिसऱ्या व्यक्तीची एंट्री  (raja rani chi g jodi new actress entry)  होणार आहे. मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत असून लवकरच या तरुणीची मालिकेत एंट्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ही तरुणी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, तिच्या भूमिकेविषयी किंवा तिच्या नावाविषयी कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. या नव्या एंट्रीमुळे संजू आणि रणजीत यांच्या आयुष्यात पुन्हा एक नवं वादळ येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. वाचा : सलमान खानचं सर्वात जास्त गाजलेलं प्रेम प्रकरण का अधुरं राहिलं? आता ही नवीन अभिनेत्री कोण? याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही. याचा उलगडा लवकरच होईल. मात्र प्रेक्षकांना याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. यासोबतच मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. मालिकेत आता बऱ्याच दिवसांनंतर रणजीत पुन्हा खाकीत दिसून येणार आहे.त्यामुळे आता हे पती-पत्नी मिळून खाकीमध्ये दुष्टांना धडा शिकवतील.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्विस्टने रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. चाहत्यांना मालिकेतील संजू आणि रणजितची केमिस्ट्री फारच आवडते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Colors marathi, Entertainment, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या