Home /News /entertainment /

मद्य कि मध? बाटली बघून गोंधळली अभिनेत्री; धम्माल VIDEO एकदा पाहाच

मद्य कि मध? बाटली बघून गोंधळली अभिनेत्री; धम्माल VIDEO एकदा पाहाच

अभिनेत्री अक्षया नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यातही तितकीच मस्तीखोर आहे. अक्षयानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात मधाची बाटली उघडण्यासाठी मोठे कष्ट घेताना दिसतेय.

  मुंबई, 02 जुलै: कलर्स मराठीवरील ( Colors Marathi) सुंदर मनामध्ये भरली ( Sundara Manamadhe Bharali) मालिकेतील लतिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकनं ( Akshaya Naik) लतीची भूमिका उत्तमरित्या वठवली. अक्षया मालिकेच्या सेटवर प्रचंड धम्माल करत असते. सध्या तिच्या पायाला दुखापत झालेली असताना देखील ती शुटींग करत आहे. पायाला लागलेलं असताना देखील तिचा उत्साह आणि मस्ती काही कमी झालेली नाही. अक्षया तिच्या वैयक्तिक आयुष्यातही तितकीच मस्तीखोर आहे. अक्षयानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात मधाची बाटली उघडण्यासाठी मोठे कष्ट घेताना दिसतेय. बाटली उघडण्याच्या नादात अक्षया ती मधाची बाटली आणि की मद्याची हेच विसरुन गेलीय. तिचा हा धम्माल व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत. आहे. अक्षयानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या मित्रानं तिला पोष्टिक मधाची बाटली आणून दिली. बाटली उघडण्याचं चॅलेंज दिल्यानंतर अक्षया बाटली उघडण्यासाठी मोठे कष्ट घेताना दिसतेय. 'जोर लगाके हैया' म्हणत अक्षया बाटलीचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करतेय. तिची बाटली उघडण्यासाठीची धडपड पाहून मित्र तिची खिल्ली उडवताना दिसतोय. अक्षयाही मित्राच्या जोकवर खळखळून हसाताना दिसते. 'ते मद्य आणि हे मध' असा फरकही तो तिला सांगत 'अडाणीपणाच्या नानाची टांग' असं म्हणत चिडवताना दिसतोय. व्हिडीओच्या शेवटी तिच्या मित्रानं एका फटक्यात मधाची बाटली उघडून मद्य आणि मध यातला फरक अक्षयाला समजावून सांगितला आहे.
  हेही वाचा - अमेय वाघला कधीच सोडायची नाहीये 'ही' नोकरी; लग्नाच्या वाढदिवसाला अखेर कबूल केलंच अक्षयाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्या चाहत्यांनीही यावर प्रतिक्रिया देत तेही अक्षयाच्या कृतीवर हसताना दिसत आहेत. 'डॅम क्यूट', 'अक्षयाचे एक्सप्रेशन तर बघा', 'किती गोड आहेस तू', अशा कमेंट्स करत अनेकांनी व्हिडीओला पसंती दिली आहे.  अक्षया असेच धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अक्षया सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं पायावर उपचार घेत आहे.  'मला शक्य तितकी विश्रांती घ्यावी लागेल. सध्या सुचवलेला हाच उपचार आहे. नियमित तपासणी होतील. पण आत्तापर्यंत, मी कमी अंतर चालू शकतेय, मी उभी राहू शकते (पण 5 मिनिटांपेक्षा जास्त नाही). माझ्या बाजूने शूटिंग करताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे मी. या आठवड्यात डॉक्टर काय म्हणतात ते पाहूया. मला तुमच्या प्रार्थनेत ठेवा', अशी पोस्ट अक्षयानं शेअर करुन तिच्या पायाचे अपडेट दिले आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या