Home /News /entertainment /

असा शुट करण्यात आला लती अन् अभ्याचा वटपौर्णिमा विशेष भाग, पाहा VIDEO

असा शुट करण्यात आला लती अन् अभ्याचा वटपौर्णिमा विशेष भाग, पाहा VIDEO

असा शुट करण्यात आला लति अन् अभ्याचा वटपौर्णिमा विशेष भाग, पाहा VIDEO

असा शुट करण्यात आला लति अन् अभ्याचा वटपौर्णिमा विशेष भाग, पाहा VIDEO

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लतिकानं थेट व्हिलचेअरवर बसून वटपौर्णिमा साजरी केली. या एपिसोडचा BTS व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    मुंबई, 22 जून: कलर्स मराठीवरील ( Colors Marathi) सुंदरा मनामध्ये भरली ( Sundara Manamadhe Bharali) या मालिकेत सध्या वटपौर्णिमे विशेष भाग सुरू आहे. या भागात लतिका व्हिलचेअरवर बसून वडाची पूजा करताना दिसत आहे. मालिकेत लतीचा अपघात झाला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. खरंतर लतिका म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईकच्या ( Akshaya Naik) पायाला खरोखर दुखापत झाल्यानं मालिकेच्या दिग्दर्शकांना मालिकेच्या कथानकात थोडा बदल केला आहे. अक्षयाच्या पायाला दुखापत झाली असतानाही तिचा शुटींग करण्याचा उत्साह कमी झालेला नाही त्यामुळे अभिनेत्रीच्या पायाला दुखापत झालेली असताना सर्व काळजी घेऊन मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भाग शुट करण्यात आला. मालिकेच्या या विशेष भागाची सध्या टेलिव्हिजनवर जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर तो एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयाच्या पायाला दुखापत झालेली असताना ती शुटींग कसं करते असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री अक्षयानं तिच्या सोशल मीडियावरुन मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागाचे BTS व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात या लतिका वडाला फेरे मारतानाचे शॉर्ट कसे घेण्यात आले हे पाहायला मिळत आहे. हेही वाचा - मला राजकन्या झाल्यासारखं वाटतंय! सारा तेंडूलकरची पोस्ट चर्चेत मालिकेचा BTS व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री अक्षया नाईकनं पोस्ट लिहीत मालिकेच्या टीमचं मनापासून कौतुक करत सगळ्यांचे आभार मानले आहेत. तिच्या पायाला दुखापत झालेली असतानाही तिला काम करण्यासाठी सपोर्ट करणाऱ्यांना तिनं थँक्यू म्हटलं आहे. अक्षयाच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. 'तू आम्हाला इन्स्पायर केलंय', असं तिच्या अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे.  मालिकेतील हा युनिक सीन प्रेक्षकांना भावल्याचं ही त्यांनी सांगितंल आहे.  मालिकेची टीम मालिकेसाठी अथक प्रयत्न करतेय असं म्हणत प्रेक्षकांनी मालिकेला शुभेच्छा दिल्यात. अभिनेत्री अक्षया नाईकच्या पायाच्या लिगामेंटला दुखापत झाली आहे. मात्र तिनं कामात कोणताही व्यत्यय येऊ दिलेला नाही. अक्षयानं मालिकेचं बरंचस शुट करुन 8 दिवस आराम करण्यासाठी सुट्टी घेतली. आराम केल्यानंतर अक्षया पुन्हा एकदा शुटींगसाठी सेटवर परतली आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Tv actor, Tv actress, TV serials, Tv shows

    पुढील बातम्या