• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Sundara Manamadhe Bharli : लतिका अभ्याला प्रेमाची कबुली देणार की.. घटस्फोट घेणार?

Sundara Manamadhe Bharli : लतिका अभ्याला प्रेमाची कबुली देणार की.. घटस्फोट घेणार?

सुंदरा मनामध्ये भरली( sundara mann madhe bharli) मालिकेत अभ्याची आई लतिका आणि अभ्याला कायदेशीररित्या विभक्त करण्यासाठी जबरदस्ती करत आहे. तर दुसरीकडे आता कुठं लतिका हळूहळू अभ्याच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : कर्लस मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली( sundara mann madhe bharli) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेपैकी आहे. सध्या ही मालिका वेगळ्या वळणावर आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अभिमन्यु आणि लतिका (akshaya naik)यांच्या नात्यात चढउतार येत आहेत. लतिकाने अभ्यासाठी मानची शर्यत जिंकली आहे मात्र तिने आजही अभ्याविषयी तिच्या मनात असलेले प्रेमाची जाणीव झालेली नाही. या शर्यतीमुळे अभ्या आणि लतिका यांच्या नात्यातील दुरावा कमी झाला (sundara manamadhe bharali latest episode ) आहे. मात्र असं जरी असलं तरी अभ्याची आई या दोघांना कायदेशीररित्या विभक्त करण्यासाठी जबरदस्ती करत आहे. तर दुसरीकडे आता कुठं लतिका हळूहळू अभ्याच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. कर्लस मराठीने नुकताच एक प्रमो प्रजर्शित केला आहे. यामध्ये, अभ्या आणि लतिका एकमेकांना भेटल्याचे दाखवण्यात आलं आहे. या दोघांची भेट झाल्यावर त्यांच्यात नेमकी काय चर्चा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीदेखील प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये लतिकाच्या मनातील अभ्याविषयी असणारे भाव सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये दिसत आहे की, लतिकाला अभ्याला काहीतरी सांगायचं आहे. वाचा : या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लेकीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण जेव्हा अभ्या लतिकाच्या समोर येतो तेव्हा तिच्या मनाची कालवाकालव झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिला त्याला काही तरी सांगायचे आहे हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. यावेळी लतिका नॉन स्टॉप स्वत:शीच मनात बोलत आहे. हा घटस्फोट नको असं लतिका अभ्याला सांगण्याच्या विचारात आहे. परंतु, अभ्याला समोर पाहिल्यावर त्याच्याशी काय बोलावं हे तिला सुचत नाही. प्रेमात पडल्यावर एकाद्याची जशी अवस्था होते तशीच काहीशी लतिकाची अवस्था झालेली आहे. तिला बोलायचं आहे मात्र तोंडातून शब्द फुटेनात अशी अवस्था लतिकाची अभ्याला पाहून झाली आहे.
  "आज सांगू का अभ्याला नको ती नोटीस, नको तो घटस्फोट.. आज किती देखणा दिसत आहेस तू. शांत डोळे, स्थिर वाटत आहेस एकदम...म्हणून का मी त्याला", असं लतिका तिच्या मनातल्या मनात बोलताना दिसत आहे. लतिकाला अभ्यावर प्रेम झालं आहे हेच दिसून येत आहे. वाचा : या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लेकीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण मात्र या सगळ्या गोष्टी लतिकाच्या मनात चालल्या आहेत. त्यामुळे लतिका अभ्याला मनातील गोष्टी सांगत त्याच्याविषयी असणारं प्रेम व्यक्त करेल का ? यानंतर या दोघांचा घटस्फोट थांबणार का..प्रेक्षकांना ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळणार का... हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं आहे. मात्र, या सगळ्याची उत्तर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published: