मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /रणजीतचा नवा व्यवसाय सुरू; ढालेपाटलांचं पुढचं पाऊल काय असणार?

रणजीतचा नवा व्यवसाय सुरू; ढालेपाटलांचं पुढचं पाऊल काय असणार?

राजा रानीची गं जोडी (Raja rani chi ga jodi) मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. ढालेपाटलांच्या (Dhalepatil) संपत्तीतील अधिकार सोडून रणजीत आपलं नवं विश्व उभारण्याचं प्रयत्न करतो आहे.

मुंबई 08 एप्रिल – ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja rani chi ga jodi) ही मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. रणजीतने ढालेपाटलांच्या (Dhalepatil) संपत्तीतील आपले सगळे अधिकार नाकारले आहेत. तर आता तो स्वत:च वेगळं विश्व, वेगळा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

मालिकेत गेले अनेक दिवस ढालेपाटलांच्या कुटुंबात वाद सुरू आहेत. तर रणजीत- संजीवनीने दुरावे मिटवून पुन्हा एकदा आयुष्याला सुरुवात केली आहे. पण कुटुंबातील कोणीही तिला स्वीकारायला तयार नाही. तर दुसरीकडे संजीवनीने आता पोलिसांत भरती होण्याचा निर्णय घेतला आहे आणि रणजीतही तिला साथ देत आहे.

रणजीतची वर्दी आपल्यामुळे गेली याचं दुख संजीवनीला आहे आणि त्यामुळेच ती पोलिसांत भरती होत आहे. तर आता पोलीस वर्दी गेल्यानंतर रणजीत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. पण घरातील सदस्य त्याच्या कामात आडकाठी आणत आहेत.

हे वाचा - सिद्धार्थ-सोनियाचा किसिंग सीन झाला लीक; व्हिडीओ पाहून प्रेक्षक झाले सैराट

ढालेपाटलांचा अर्थात कुसुमावती म्हणजेच रणजीतची आई आणि अजित यांचा मात्र रणजीतला पूर्णपणे विरोध आहे. तरीही रणजीत हार न मानता अखेर त्याचा व्यवसाय सुरू करत आहे.

त्यामुळे आता प्रेक्षक संजीवनीला पोलिसांच्या वर्दीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर रणजीत संपूर्ण ढालेपाटलांचा विरोध पत्करून कशाप्रकारे यशस्वी होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हे वाचा - ‘सामान्य माणसाला काम करु का देत नाही?’ लॉकडाउनच्या निर्णयावर अभिनेता संतापला

कलर्स मराठी (colors Marathi) वाहिनीवरील या मालिकेतील रणजीत – संजीवनी (Ranjit- Sanjeevani) ही जोडी प्रेक्षकांना प्रंचड भावली. तर नुकत्याच पार पडलेल्या कलर्स मराठी पुरस्कारांमध्ये (colors marathi awards) त्यांना सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कारही मिळाला. मालिकेत शिवानी सोनार, मनिराज पवार हे मुख्य कलाकार असून अभिनेत्री शुभांगी गोखले, गार्गी फुले, श्रुती अत्रे, श्वेता खरात असे कलाकार काम करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Marathi entertainment, Serial