मुंबई, 1 जानेवारी- नवीन वर्षावर अनेक मराठी वाहिन्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. कर्लस मरठी वाहिनी देखील यामध्ये मागे नाही. आता कर्लस मराठी वाहिनी लवकरच दोन बहिणींच्या आयुष्यावर एक मालिका घेऊन प्रेक्षकांच्या (colors marathi new serial) भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव नक्की झाले नसले तरी या मालिकेचे कास्टिंग सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला (Asava Sundar Swapnancha Bangla ) या मालिकेचा दुसरा भाग असण्याची शक्यता देखील प्रेक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे.
एका पोर्टलने याविषयी माहिती दिली आहे. यामध्ये दोन लहान मुलींचा फोटो देखील समोर आला आहे. मात्र त्यांच्या नावाचा मात्र उलगडा झालेला नाही. शिवाय मालिकेचे शिर्षक काय असणार याची देखील माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे यासाठी मालिकेच्या प्रोमोची वाट पाहावी लागणार आहे. त्यावेळीच याविषयी माहिती समोर येईल. प्रेक्षकांना मात्र आता कर्लस मराठीवर मनोरंजनाचा डब्बल डोस मिळणार आहे.
चाहत्यांनी मात्र ही मालिका कर्लस मराठी वाहिनीवरील असावा सुंदर स्वप्नांचा बंगला (Asava Sundar Swapnancha Bangla ) या मालिकेचा दुसरा भाग असणार असल्यााच अंदाज कमेंट करत वर्तवला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागली आहे.
वाचा-जोतिबाच्या नावानं चांगभलं; BB Marathi विजेता विशाल निकमने घेतले जोतिबाचे दर्शन!
नवीन वर्षावर अनेक मराठी वाहिन्यांनी अनेक मनोरंजनात्मक शो सुरू केले आहेत. प्रत्येक वाहिनी टीआरपीच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत असते. अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.