'जय जय स्वामी समर्थ' मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला; हा कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

'जय जय स्वामी समर्थ' मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला; हा कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

जय जय स्वामी समर्थ (Jay Jay Swami Samaratha) ही मालिका आजपासून कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 डिसेंबर: जय जय स्वामी समर्थ (Jay Jay Swami Samartha) ही आध्यात्मिक मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजपासून रात्री 9.30 वाजता कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर या मालिकेचं प्रक्षेपण होईल. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे प्रोमो व्हायरल झाले आहेत. मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमुळे स्वामी भक्तांवर श्रद्धेचं गारुड घातलं होतं. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात अनेक स्वामी भक्त आहेत. त्यामुळे या मालिकेबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

जय जय स्वामी समर्थ या मालिकेत अक्षय मुडावतकर हा कलाकार स्वामी समर्थांची भूमिका साकारत आहे. अक्षयने या आधी स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत काम केलं आहे. तसंच गांधी हत्या आणि मी हे नाटकही त्याच्या नावावर आहे. स्वामी समर्थ म्हणून त्याची छबी लक्ष वेधून घेत आहे. शिरिष लाटकर यांनी या मालिकेचं लेखन केलं आहे. या मालिकेच्या अनुभवाबद्दल लाटकर म्हणाले, ‘श्री स्वामी समर्थ हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली 20 वर्ष मी स्वामी मार्गात आहे. त्यामुळे मी ज्यांची भक्ती करतो त्या स्वामींची गोष्ट मालिकेच्या रूपात सांगायला मिळणं हा एक आनंददायी अनुभव आहे’

चांगल्या माणसांचं भलं करुन 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे' असं म्हणत त्यांना आशीर्वाद देणारे स्वामी आणि दृष्ट व्यक्तींना चांगल्या वळणावर आणून त्यांच्या आयुष्याचा उद्धार करणारे स्वामी. अशा स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत. श्री क्षेत्र अक्कलकोट इथे असताना चोळप्पाशी, सेवेकरी सुंदराबाई, अक्कलकोटचे राजे मालोजीराव, या भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि कृतार्थ झाले त्यांचं स्वामींशी कसं नातं होतं आणि या मार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 28, 2020, 12:42 PM IST

ताज्या बातम्या