‘हलकट जवानीवर मी आग लावली असती’; करिना कपूरला संभावनाचं आव्हान

‘हलकट जवानीवर मी आग लावली असती’; करिना कपूरला संभावनाचं आव्हान

करीना कपूरच्या नृत्य कौशल्याबाबत शंका व्यक्त करणारे वक्तव्य करत खळबळ माजवली आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांपूर्वीही तिनं असेच वक्तव्य केलं होतं.

  • Share this:

मुंबई 3 एप्रिल: बॉलीवूडमध्ये बोल्ड डान्ससाठी प्रसिद्ध असणारी भोजपुरी अभिनेत्री आणि बिग बॉस 2मधील (Bigg Boss 2)स्पर्धक संभावना सेठ (Sambhavana Seth) ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. आपल्या बेछूट वक्तव्याबद्दलही ती प्रसिद्ध आहे. नुकतेच तिनं करीना कपूरच्या नृत्य कौशल्याबाबत शंका व्यक्त करणारे वक्तव्य करत खळबळ माजवली आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांपूर्वीही तिनं असेच वक्तव्य केलं होतं.

करीना कपूरनं हिरोईन चित्रपटात हलकट जवानी या गाण्यावर नृत्य केलं होतं. या गाण्यावर आपण अधिक चांगलं नृत्य केलं असतं, स्टेजवर आग लावली असती, असा दावा संभावना सेठ हिनं साधारण दहा वर्षांपूर्वी, 2012मध्ये एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर अलीकडेच ई-टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत हलकट जवानी गाण्यावरील नृत्याबाबत आजही तिचं हेच मत आहे का? असं विचारलं असता, तिनं होय असं उत्तर देत, आजही आपण याच मतावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

अवश्य पाहा - ‘असा अभिनय यापूर्वी पाहिला नाही’; कार्तिक आर्यनचा धमाका पाहून अमृता झाली स्तब्ध

अवश्य पाहा - लता मंगेशकरांच्या सल्ल्याकडे केलं होतं दुर्लक्ष; त्या चूकीसाठी हरिहरन आजही मागतायेत माफी

बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री डबल स्टँडर्ड ठेवतात. त्या चित्रपटांमध्ये आयटम सॉंगवर डान्स करू इच्छितात; पण आयटम गर्लचा शिक्का त्यांना नको असतो. अनेकजणी अशा आहेत ज्या त्या गाण्याला आपल्या नृत्यानं योग्य न्याय देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे ते कौशल्यच नसते,’ असं त्या मुलाखतीत संभावना सेठनं म्हटलं होतं. त्या वेळी तिनं कतरीना कैफच्या चिकनी चमेली या गाण्यावरील नृत्याचं कौतुक करत, करीना कपूरनं केलेल्या गाण्यावर आपण जास्त चांगलं नृत्य केलं असतं अशी टिप्पणी केली होती.

‘मी एक उत्तम डान्सर आहे. मला काम द्या; माझं कौशल्य मी दाखवून देईन. माझ्या हातातून चांगले चांगले प्रोजेक्ट निसटून गेले, आजही मला त्याचं दुःख होतं. हातातून निसटलेल्या संधीचा विचार करून आजही मला रडायला येतं,’ असं तिनं ई टाईम्सला दिलेल्या ताज्या मुलाखतीत सांगितलं. बॉलीवूडमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत, बॉलीवूडनं आपल्याला आपलं कौशल्य दाखवायला संधी दिली नाही. आपला हक्क नेहमीच डावलला गेला अशी खंतही तिनं व्यक्त केली. ‘एका मोठ्या हिरोनं अनेक वर्ष वाट बघायला लावली; मात्र माझा आत्मसन्मान अधिक महत्त्वाचा असल्यानं मी कधीही त्याची हुजरेगिरी केली नाही, असंही तिनं या मुलाखतीत सांगितलं.

First published: April 3, 2021, 6:41 PM IST

ताज्या बातम्या