• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Cobalt Blue trailer: बहिण आणि भाऊ दोघंही पडले त्याच्या प्रेमात! Love Triangle मध्ये फसलाय प्रतिक बब्बर

Cobalt Blue trailer: बहिण आणि भाऊ दोघंही पडले त्याच्या प्रेमात! Love Triangle मध्ये फसलाय प्रतिक बब्बर

Cobalt Blue Trailer: प्रेम आणि विश्वासघात या सिनेमात पाहायला मिळणार आहे. बहुतांश बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे हा लव्ह ट्रँगल नसून यामध्ये दोन बहिण-भावांचे एकाच मुलावर प्रेम जडले आहे

 • Share this:
  मुंबई, 13 नोव्हेंबर: ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी गेल्या काही काळापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नेटफ्लिक्सने (Upcoming Movie on Netflix) देखील दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांना देत त्यांचं वर्चस्व नेहमी सिद्ध केलं आहे. शुक्रवारी देखील नेटफ्लिक्सच्या एका नव्या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या सिनेमाचं नाव आहे कोबाल्ट ब्लू (Cobalt Blue trailer). नेटफ्लिक्स ओरिजिनल मुव्ही असणाऱ्या या सिनेमामध्ये प्रेक्षकांना लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार आहे. बहुतांश बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे हा लव्ह ट्रँगल नसून यामध्ये दोन बहिण-भावांचे एकाच मुलावर प्रेम जडले आहे. या मुलाची भूमिका मराठमोळी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर (Prateik Babbar new Movie) साकारत आहे. तर बहिण भावांच्या भूमिकेत नीलय मेहेंदळे आणि अंजली शिवरामन (Love Triangle of Prateik Babbar, Neelay Mehendale and Anjali Sivaraman) असणार आहे. हे वाचा-'Govinda Naam Mera' मध्ये विकी-भूमि बनणार पती-पत्नी; तर गर्लफ्रेंड बनून कियारा.. कोबाल्ट ब्लूचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर (Sachin Kundalkar Cobalt Blue) असून याच नावाने प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक 'बेस्ट सेलिंग' पुस्तकांपैकी एक होते. हा सिनेमा 3 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दोन मिनिटांपेक्षा अधिक असणाऱ्या या ट्रेलरमध्ये पात्रपरिचय होत आहे. यात समजून येते की, यामध्ये दाखवण्यात आलेले कुटुंब नुकतेच केरळमध्ये स्थायिक झाले आहे. या कुटुंबातील भावंडांपैकी मुलीला हॉकी खेळण्यामध्ये आनंद मिळतो. तिच्या केसांची ठेवणही लक्ष वेधून घेणारी आहे. तर तिचा भाऊ एकांतात वेळ घालवणारा-कविता करणारा असा दाखवण्यात आला आहे. त्याठिकाणी त्यांच्या नवीन घरात प्रतिक बब्बर पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी येतो. त्याच्याकडे ही भावंड आकर्षित झाल्याचं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. यामध्ये प्रतिक आणि नीलय ज्या भूमिका साकारतायंत त्यांच्यातील मैत्री दाखवण्यात आली आहे. पण ट्रेलरमध्ये काहीच मिनिटांत कळतं की हा पेइंग गेस्ट त्याच्या बहिणीसह पळून जातो. तिला घरी परत तर आणतात पण तोपर्यंत कुटुंबाला मोठा धक्का बसलेला असतो. शिवाय त्या दोन्ही भावंडांचे मन एकाच माणसाने दुखावल्याने ते सर्वात कठीण प्रसंगातून जात असल्याचं यात दाखवण्यात आलं आहे. हे वाचा-शोएब मलिकचे पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत Romantic Photo व्हायरल, फॅन्स म्हणाले... प्रेम आणि विश्वासघात यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत, शुक्रवारी या सिनेमाचा ट्रेलर शेअर केल्यानंतर अशाप्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अनेक कलाकारांनी देखील या नव्या धाटणीच्या सिनेमासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: