'एका महान कलावंतास देश मुकला', मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

'एका महान कलावंतास देश मुकला', मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

अष्टपैलू, बहुआयामी, सशक्त अशी कित्येक विशेषणं ज्या अभिनेत्याला लावता येतील असा अभिनेता इरफान खान आज काळाच्या पडद्याआड गेला.

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल : अष्टपैलू, बहुआयामी, सशक्त अशी कित्येक विशेषणं ज्या अभिनेत्याला लावता येतील असा अभिनेता इरफान खान आज काळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह सर्वच घटकातील मान्यवरांनी इरफानबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.'अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे.' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली वाहिली.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल असाच आहे.

दुर्धर असा कॅन्सर झाला असूनही न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले. दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही इरफान खानच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही 'एका महान कलावंतास देश मुकला' अशा शब्दात भावना व्यक्त केली.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की..,

अभिनेते रितेश देशमुख यानेही तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.

इऱफानचा चित्रपट म्हटला की, एका कसदार अभिनेत्याचं जणू  विद्यापीठ होतं. त्यामुळे त्यानं साकारलेल्या प्रत्येक व्यक्तीरेखेतून त्यानं ती पात्रं जिवंत केली. आज त्याच अभिनेत्याची मृत्यूशी चालत असणारी झुंज संपली. गेल्या कित्येक दिवसांपासून कॅन्सरनं ग्रस्त असणारा आणि कित्येकांच्या मनामनातला  लाडका अभिनेता इरफान खान यानं आज अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारे आज काळाच्या पडद्याआड झाला आहे. बॉलिवूडमधील आणखी एक तारा निखळल्यानं शोककळा पसरली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 29, 2020, 1:14 PM IST

ताज्या बातम्या