SSR Death Case: सुशांत मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट, 'त्या' घटनेबाबत CM नितीश कुमार थेट करणार ठाकरे सरकारशी चर्चा

SSR Death Case: सुशांत मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट, 'त्या' घटनेबाबत CM नितीश कुमार थेट करणार ठाकरे सरकारशी चर्चा

सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना बीएमसीने क्वारन्टाइन केलं आहे, आता हे प्रकरण पेटण्याची चिन्ह दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 3 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh Rajput suicide case) आत्महत्येप्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर नाराजी दाखवत सुशांतच्या कुटुंबियांनी पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर तपासासाठी आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत आले. मात्र मुंबईत आल्यानंतर मुंबई महापालिकेने विनय तिवारी यांना क्वारन्टाइन केलं, आता हे प्रकरण पेटण्याची चिन्ह दिसत आहे. पालिकेने क्वारंटाइन केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत न्यूज 18ला दिलेल्या एक्सक्लुजिव्ह माहितीत, महाराष्ट्र सरकारशी याबाबत चर्चा करणार असून, आमच्या पोलीस अधिकाऱ्याला दिलेली वागणूक चुकीची असल्याचे म्हटलं आहे. तसेत नितीश यांनी हा कायद्याचा प्रश्न आहे. पोलीस अधिकाऱ्याला अशी वागणूक देणे योग्य नाही, असे सांगितले. दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये पाटणा पोलिसांना मिळालेल्या वागणूकीबाबत कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. त्यांच्या मते झालेला प्रकार हा CRPC चे उल्लंघन आहे. त्यामुळे आता या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.

वाचा-सुशांत आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMC ने केलं क्वारन्टाइन

याआधी तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना (Bihar police) मुंबई पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. कारण मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांच्या टीमला कोणतंही वाहन उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. तसंच त्यांच्या सुरक्षेसाठीही काही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बिहार पोलिसांवर रिक्षाने फिरण्याची वेळ आली.

वाचा-सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकीय फायद्यासाठी राजकारण- गृहमंत्री

बिहार पोलिसांनी केली दिग्दर्शकाची चौकशी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या बिहार पोलीस आणखी एका चित्रपट दिग्दर्शकाच्या घरी पोहोचले. रिया आणि सुशांत यांच्याबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल या दिग्दर्शकाने यापूर्वीसुद्धा वक्तव्य केलं होतं. सुशांतच्या रॉम कॉम चित्रपटाचे दिग्दर्शक रुमी जाफरी (Rumi Jaffery) यांच्या मुंबईच्या घरात बिहार पोलीसांनी चौकशीसाठी हजेरी लावली. रुमी जाफरी यांनी काही दिवसांपूर्वी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी काही मोठे खुलासे केले होते. विशषतः रिया चक्रवर्ती आणि सुशांत यांच्या नात्याविषयी रुमीने वक्तव्य केलं होतं. रुमी म्हणाले होते, "सुशांत आणि रिया एकमेकांबरोबर खूश होते. लवकरच त्या दोघांच्या एकत्रित चित्रपटाला सुरुवात होणार होती आणि मेमध्ये शूटिंगच्या तारखा होत्या. पण Coronavirus च्या भीतीने शूटिंग पुढे ढकललं होतं."

Published by: Priyanka Gawde
First published: August 3, 2020, 10:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading