EXCLUSIVE : देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतर माझं गाणं सुरू झालं नाही- अमृता फडणवीस

EXCLUSIVE : देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतर माझं गाणं सुरू झालं नाही- अमृता फडणवीस

अनेकांना वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि मी त्यानंतर गाणं गायला सुरुवात केली. पण यात काही तथ्य नाही.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट- कबीर सिंग (Kabir Singh) सिनेमातील 'तेरा बन जाऊंगा' हे गाण्याचं कव्हर व्हर्जन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं आहे. मुळ गाण्याला तुलसी कुमार आणि अखिल सचदेवा यांनी आवाज दिला आहे. सिनेमात हे गाणं मेल व्हर्जनमध्ये आहे. मात्र टी-सीरिजने आता फीमेल व्हर्जनमध्ये हे गाणं रेकॉर्ड केलं आहे. अवघ्या 24 तासांमध्ये या गाण्याला 45 लाखांहूनही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

कबीर सिंगची सर्वच गाणी तुफान गाजली होती. या गाण्याबद्दल बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘जेव्हा त्यांनी मला या गाण्यासाठी विचारलं तेव्हा मी लगेच होकार दिला. हे माझं आवडतं गाणं आहे. मुळ गाण्याचं नाव 'तेरा बन जाऊंगा' असं आहे तर या फीमेल व्हर्जनचं टायटल बदलून 'तेरी बन जाऊंगी' असं करण्यात आलं आहे. मला या गाण्याचं संगीत आवडलं आणि विशेष म्हणजे तुलसी कुमारने ज्या पद्धतीने हे गाणं गायलं तेही अवर्णनीय आहे.’

 

View this post on Instagram

 

‪#आपले सर्वांचे प्रिय मुख्यमंत्री श्री @devendra_fadnavis ज़ींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! 💐 ‬#birthdaywishes #birthday

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis) on

यावेळी आपल्या गाण्याच्या रियाजाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, 'अनेकांना वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि मी त्यानंतर गाणं गायला सुरुवात केली. पण यात काही तथ्य नाही. मी लहानपणापासूनच गाणं गात आहे. माझ्या बाबांनी मला याचे धडे दिले. फार कमी लोकांना हे माहीत आहे की मी शास्त्रीय गाणं शिकलं आहे. आजही मी गुरुजींसमोर बसून रियाज करते. अनेक सामाजिक कामं आणि इतर गोष्टींमुळे इतरांप्रमाणे मला गाण्यासाठी पूर्ण वेळ देता येत नाही. पण मी प्रामाणिकपणे माझं गाणं गाते. हे मी करिअर म्हणून करत नाही तर माझी आवड आहे म्हणून करते. नेमकी हीच गोष्ट प्रेक्षकांनाही भावत असेल.'

कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर अफलातून बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. शाहिद कपूर आणि किआरा आडवाणी यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात होत्या. आतापर्यंत या सिनेमाने 275 कोटींचा गल्ला कमवला आहे. अर्जुन रेड्डी या दाक्षिणात्य सिनेमाचा हा अधिकृत हिंदी रिमेक होता. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने अर्जुन रेड्डीमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमाही सुपर हिट झाला होता.

बॉलिवूड अभिनेता म्हणाला, 'आता काश्मिरी मुलीशी लग्न करेन आणि...'

समोर आलं अभिनेत्रीचं दुःख, लग्नानंतर काश्मीरपासून झाली होती दूर

Article 370 ने भडकल्या पाकिस्तानी अभिनेत्री, म्हणाल्या- ‘स्वर्ग जळतोय आणि आपण..'

Article 370 वर तीनही खानांची 'अळीमिळी गुपचिळी'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 06:56 PM IST

ताज्या बातम्या