मुंबई,26 जानेवारी: प्रजासत्ताक दिन 2021 च्या (Republic Day) मुहूर्तावर जॉन अब्राहमने (John Abraham) आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत त्याच्या बहुप्रतीक्षित 'सत्यमेव जयते 2' ची (satyamev jayate) रिलीज डेट जाहीर केली आहे. 'सत्यमेव जयते 2' आता ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. मात्र याच मुहूर्तावर सलमान खानचा ‘राधे’ (Radhe: Your Most Wanted Bhai) हा देखील प्रदर्शित होतोय. जॉन अब्राहमने आपल्या आधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे.
14 मे 2021 ला, म्हणजेच ईदच्या दिवशी हा चित्रपट आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाईलं. 'सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन सोबत दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) मुख्य भूमिकेत दिसुन येणार आहे. तसेच मनोज बाजपेयी, नोरा फतेही, अनुप सोनी, गौतमी कपूर अशी तगडी स्टारकास्ट देखील आहे.
जॉनने ट्विट करत म्हटलं की, ‘तन मन धन से बढ़कर जन गण मन…। सत्यमेव जयतेच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ईद 2021 च्या मुहूर्तावर आम्ही तुम्हाला भेटू. '
TANN MANN DHANN, se Badhkar JANN GANN MANN! The team of #SatyamevaJayate2 wishes everyone a Happy Republic Day!
See you in cinemas this EID on 14th May 2021 pic.twitter.com/iFSMq9qMrS — John Abraham (@TheJohnAbraham) January 26, 2021
ह्याआधी बॉलीवूडचा भाईजान सलमान खान ह्याने सुद्धा आपला 'राधे' ईद 2021 ला प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.या चित्रपटात सलमानसोबत मुख्य भूमिकेत दिशा पटानी,रणदीप हुडा असतील. चित्रपटगृहाच्या मालकांनी सलमानला विनंती केल्यानंतरच सलमानने ईद च्या मुहूर्तावर 'राधे' प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.
Instagram वर ही पोस्ट पहा
ह्या ईदला दोन मोठे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार म्हणुन चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सलमानच्या 'राधे' विरुद्ध जॉनच्या 'सत्यमेव जयते 2' मध्ये नक्की कोण बाजी मारणार ह्याकडेच सगळ्याचं लक्ष लागुन आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Salman khan