मुंबई 21 जुलै: सीटी ऑफ ड्रीम ही हॉटस्टारच्या सर्वाधिक गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक म्हणून ओळखली जाते. एकामागून एक येणारे ट्विस्ट, जबरदस्त अभिनय आणि पॉलिटिकल ड्रामा यामुळे सीटी ऑफ ड्रीमचा पहिला सीझन तुफान गाजला होता. त्यानंतर आता सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच रीलिज करण्यात आला. यामधील मराठमोळ्या प्रिया बापटचा ढासू अंदाज पाहून प्रेक्षक आश्चर्य चकित झाले आहेत.
प्रियाने इन्स्टाग्रामवर सीटी ऑफ ड्रीमचा ट्रेलर शेअर केला आहे. या सीझनमध्ये मुलगी आणि वडिलांमध्ये सत्तेचा खेळ कसा रंगतो? हे दाखवण्यात येणार आहे. खुर्चीच्या लालसेपुढे सर्व नाती व्यर्थ असतात. एखादा राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो अन् त्याची मुलगी देखील त्याला कशी जोरदार टक्कर देते हे या सीरिजमध्ये दाखवलं जाणार आहे.
‘आमचा नाद लय बाद’; ‘देवमाणसा’ला घाबरवणाऱ्या चंदीवर होतोय कौतुकाचा वर्षाव
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी पॉर्न प्रकरणात सामिल? या मॉडेलकडे मागितला होता न्यूड व्हिडीओ
या सीरिजमध्ये प्रियासोबतच सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. मराठी कलाकारांच्या जबरदस्त अभिनयामुळे ही सीरिज गाजली होती. आता दुसऱ्या सीझनचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्कंठा कमालीची वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Marathi entertainment, Web series