मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sachin Pilgaonkar on Retirement : महागुरूंना नाही घ्यायची रिटायरमेंट; म्हणाले, माझ्यासारखी व्यक्ती तर...

Sachin Pilgaonkar on Retirement : महागुरूंना नाही घ्यायची रिटायरमेंट; म्हणाले, माझ्यासारखी व्यक्ती तर...

सचिन पिळगावकर होणार रिटायर्ड?

सचिन पिळगावकर होणार रिटायर्ड?

सिटी ऑफ ड्रिम या वेब सीरिजच्या प्रमोशन दरम्यान सचिन पिळगावकरांनी त्यांच्या रिटायरमेंटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई,  26 मे : मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सिटी ऑफ ड्रिम या वेब सीरिजमधून ओटीटी विश्वात पादर्पण केलं आहे. सिटी ऑफ ड्रिमचे दोन्ही सीझन प्रेक्षकांना प्रचंड आवडले. प्रेक्षकांनी दोन्ही सीझनला भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता तिसऱ्या सीझनची प्रेक्षक वाट पाहत आहेत. या सीझनमध्ये देखील सचिन पिळगावकरांच्या भूमिकेचे नवे पैलू पाहायला मिळणार आहे. दरम्यान वेब सीरिजच्या प्रमोशन दरम्यान सचिन पिळगावकरांनी त्यांच्या रिटायरमेंटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी थेट मला रिटायरमेंटचं नको आहे असं स्पष्ट सांगून टाकलं आहे. काय आहे यामागचं कारण? सचिन पिळगावकर असं का म्हणाले पाहूयात.

सिटी ऑफ ड्रिम या सीरिजमध्ये मराठी स्टारकास्ट पाहायला मिळतेय. अभिनेत्री प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सचिन पिळगावकर यांनी यात  जगदीश गुरव हे पात्र साकारलं आहे. तो एक धूर्त आणि कपटी राजकारणी नेता आहे. त्यांचा भूमिकेची पुढची छटा सिटी ऑफ ड्रिमच्या तिसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -  10वर्षांनी लहान मुलीशी लग्न, अभिनयातील करिअर फ्लॉप नंतर...; महागुरूंच्या आयुष्यातील या गोष्टी माहितीये का?

सचिन पिळगावकर यांनी  गेली 60 वर्ष सिनेसृष्टीत काम केलं आहे. इतक्या वर्षात त्यांनी बदलती सिनेसृष्टी, बदलतं तंत्रज्ञ, नवनवे कलाकार पाहिले आहेत.  इतके वर्ष काम केल्यानंतर आता निवृत्त घेणार का असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी नाही असं उत्तर दिलं आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

अभिनयातून रिटारमेंट घेण्याबद्दल सचिन पिळगावकर म्हणाले, व्हिस्कीची बाटली आणि एखाद्या अभिनेत्याला एक्सपायरी डेट अशी असते असं मला अजिबात वाटत नाही. यामध्ये मी दोन्ही गोष्टींचा सन्मान करतो. मला असं वाटतं की काही गोष्टी आपल्याबरोबर नेहमीच राहतात आणि त्यात काही गैर नाहीये. फक्त स्वत:ला इतरांवर लादता कामा नये. जे तुमच्या वयाला शोभत नाही ते तुम्ही न केलेलं बरं. त्यामुळे माझ्यासारखी व्यक्ती तर रिटारमेंटचा विचारही करू शकत नाही.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood News, Marathi entertainment, Marathi news