15 दिवसांपासून सुरू असलेला सिने तंत्रज्ञांचा संप मागे

15 दिवसांपासून सुरू असलेला सिने तंत्रज्ञांचा संप मागे

या संपात कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निर्मात्यांसोबत मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवल्यानंतर कामगार संघटनांनी हा संप मागे घेतलाय.

  • Share this:

30 आॅगस्ट : सिने कामगार आणि तंत्रज्ञ यांनी १५ दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर मागे घेण्यात आलाय. या संपात कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निर्मात्यांसोबत मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवल्यानंतर कामगार संघटनांनी हा संप मागे घेतलाय. हिंदी सिनेमा आणि टीव्ही मालिकांसाठी काम करणाऱ्या कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी कामगारांची शिखर संघटना असलेल्या वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज असोसिएशनने हा संप पुकारला होता.

यात कामगारांची शिफ्ट ८ तासांची करण्यात यावी, पगारात वाढ करावी, महिन्याला चार सुट्ट्या मिळाव्यात, विमा काढण्यात यावा आणि प्रत्येक कामगाराला कामाची शाश्वती मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्या कायद्याला धरून असल्याने त्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन कामगारमंत्र्यांनी दिलं. त्यामुळे तूर्तास हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.

First published: August 30, 2017, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading