... म्हणून 'सीआयडी'ला घ्यावा लागतोय ब्रेक!

सीआयडी मालिकेची अनेक घरात सवयच लागली होती. ही मालिका पाहात पाहात एक पिढी मोठी झाली. आता ही मालिका ब्रेक घेतेय

  • Share this:

गेली 21 वर्ष सुरू असलेली सीआयडी मालिका बंद पडणार अशा बातम्या आल्या होत्या. पण ही मालिका बंद होत नाहीय. तर ती ब्रेक घेतेय, असं वाहिनीकडून सांगण्यात आलंय.

बरीच वर्ष एसीपीच राहिलेले प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम या मालिकेचा कणा. मध्यंतरी काही एपिसोड्स वगळता त्यांनी या मालिकेसाठी अविरत काम केलं. त्यांचा 'मी शिवाजी पार्क' सिनेमा नुकताच रिलीज झाला. आता ते डाॅ. सलील कुलकर्णींच्या 'वेडिंगचा शिनेमा'चं पुण्यात शूटिंग करतायत.याबद्दल बोलताना ते म्हणाले, ' हाही मध्यमवर्गाच्या व्हॅल्यूंवरचा सिनेमा आहे. गोड संसाराची गोष्ट आहे.'

सीआयडीमध्ये दयाची भूमिका करणाऱ्या दयानंद शेट्टी या अभिनेत्यावरून दरवाजा तोड दे दया हा डायलाॅग खूप प्रसिद्ध आहे. दयानंद अगोदर खेळाडू होता. पायाला दुखापत झाल्यानं त्यानं स्पोर्टस् सोडलं.

सीनियर इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका करणाऱ्या आदित्य श्रीवास्तवनं शेखर कपूरच्या बँडिट क्वीनमध्येही काम केलंय. याशिवाय त्यानं ब्योमकेश बक्शी, रिश्ते, नया दौर या मालिकांमध्ये काम केलंय.

सीआयडी फेडरिक्सची भूमिका करणारा दिनेश फडणीसनं सरफरोश आणि मेला सिनेमात काम केलंय. तो लेखकही आहे.

सीआयडी ब्रेक घेण्याचं कारण म्हणजे आता ही मालिका आणखी थ्रिलिंग करण्याचा विचार वाहिनीचा आहे. या मालिकेत आता आणखी थ्रिल असणार आहे. काही नवे चेहरेही पाहायला मिळतील. सीआयडीमध्ये डाॅक्टरची भूमिका करणारे नरेंद्र गुप्ता अनेक मालिकांमध्येही काम करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2018 10:12 AM IST

ताज्या बातम्या